नमस्कार मित्रानो
मित्रानो तवा आपल्या किचन एक अविभाज्य भाग आहे. जर तवा नसता तर आपण भाकरी किंवा चपाती बनवूच शकलो नसतो. आज आपण तव्याच्या बाबतीत अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या गोष्टी आजवर तुम्हाला कोणीही सांगितल्या नसतील. वास्तुशास्त्रानुसार किचन मध्ये तव्याचे काय महत्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
आपल्यापैकी कितीजणांना हे माहित नसेल कि तवा किंवा कढई राहूचे प्रतिनिधित्व करतात. हे आपले नशीब बिघडवू शकतात किंवा आपल्याला अधोगतीकडे नेऊ शकतात. हिंदू धर्मानुसार तवा कधीही पालथा ठेवू नये.
घरात ज्यावेळी कोणाचा मृत्यू होतो त्यावेळी तवा पालथा टाकतात , म्हणजेच घरात स्वयंपाक बनविला जाणार नाही असा याचा अर्थ होतो. घरातील कोणी सदस्य मृत झाल्यास तव्याचा वापर बंद केलेला आहे हे दर्शवण्यासाठी तवा पालथा टाकला जातो.
जर कोणी व्यक्ती घरात मुद्दाम तवा पालथा टाकत असतील तर हे एक अशुभतेचे लक्षण आहे. म्हणून चुकून सुद्धा कधीही तवा पालथा टाकू नये. खूप वर्षांपर्यंत एकच तवा वापरु नये. कारण दिवसेंदिवस त्यावर तेलाचा थर जमा होत जातो , खूप घासून सुद्धा थर निघत नाही.
काही घरांमध्ये तेलाचे थर जमा होऊन अगदी काळेकुट्ट झालेले तवे असतात. अशाच तव्यावर चपाती , भाकरी केल्या जातात. परंतु हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण त्याच तव्यावर स्वयंपाक करतो त्यावेळी त्या थराचे काही अंश आपल्या स्वयंपाकात उतरतात. अशामुळे आजारांना निमंत्रण मिळत असते.
खूप काळापर्यंत आपण तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या तव्यावर स्वयंपाक केला तर आपल्याला दोष लागतो. अशा परिस्थिती आपण कधीची धनवान होऊ शकत नाही. आपण कायम दरिद्रीच राहतो किंवा हळू हळू आपली वाटचाल दारिद्र्याच्या दिशेने व्हायला सुरवात होते.
तवा , कढई याचे काम झाले कि लगेचच स्वच्छ करून जागेवर ठेवून द्यावे. गरम गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये. यामुळे घरात भांडण तंटे आणि वादविवाद होतात. घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत राहते.
म्हणून तवा थंड झाल्यानंतरच त्याच्यावर पाणी टाकावे. तवा व कढई नेहमी स्वच्छ ठेवावी , नाही तर दोष लागतात. स्वयंपाक करताना ज्यावेळी आपण पहिली चपाती किंवा भाकरी तव्यावर टाकतो त्यापूर्वी तव्यावर थोडेसे दूध शिंपडावे व त्यानंतर चपाती भाकरी करण्यास सुरवात करावी.
असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. घरात बनवलेली पहिली भाकरी असो किंवा चपाती असो थोडे साजूक तूप लावून गो मातेला खायला द्यावी. कारण गाई मध्ये ३३ कोटी देवी देवतांचा वास असतो.
गाईला जर पहिली चपाती खायला दिली तर आपल्यावर सर्व देवी देवतांची कृपा होते व धनाची कमतरता कधीची जाणवत नाही.आपल्यावर देवी अन्नपूर्णेचा सदैव आशीर्वाद राहून आपले घर सदैव धन धान्याने भरलेले राहते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.