उसने दिलेले पैसे परत मिळत नसतील तर करा हे एक काम… उसने घेणारा स्वतः पैसे आणून देईल…

0
737

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो बऱ्याचदा आपण मदतीच्या उद्देशाने काही लोकांना आर्थिक मदत करतो, त्यांची गरज भागवतो, पण काही लोक मदतीचा हात विसरून जातात. काही लोक तुमचे पैसे परत करण्यासाठी ते उत्सुक नसतात किंवा काही लोक तर अक्षरशः फ रार होतात किंवा पळून जातात. याचा आपल्याला खूप त्रास होतो, खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

मित्रांनो आजचा हा उपाय तुम्ही करत असताना मनात सतत सकारात्मक विचार ठेवा, नेहमी सकारात्मक कृती करा व जे पैसे येणार आहेत ते येणारच आहेत, येतील त्यासाठीच हा उपाय सकारात्मकतेने करत आहे असं सतत स्वतःला सांगत रहा. तुमचे पैसे घेऊन जर बराच काळ म्हणजे वर्ष दोन वर्षे झाली असतील तर तुम्ही हा प्रभावी उपाय करून पहा.

समोरच्या व्यक्तीकडून जर तुमचे पैसे येण्याची आशा संपत चालली असेल तर हा उपाय करा. त्यासाठी आपण कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. या उपाया साठी आपल्याला भरपूर प्रमाणात देशी कापूर लागणार आहे. हा देशी कापूर घेऊन तो एका बंद डबीमध्ये जाळा व नंतर त्याची काजळी काढून घ्या. काजळी काढण्यासाठी आपल्याला एक भोजपत्र लागणार आहे जे तुम्हाला अगदी स्वस्त दरात कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा ऑ नला इन मिळू शकतात.

मित्रांनो पूर्वी हे भोजपत्र बऱ्याच कारणांसाठी वापरले जायचे. ज्याचा उपयोग ऋषी मुनी करायचे, त्यामुळे भोजपत्राचे खास महत्व आहे. या कागदावर त्या जाळलेल्या कापराच्या काजळीने त्या व्यक्तीचे नाव लिहा, ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले आहेत. तसेच त्या कागदावर तुम्ही सात वेळा उजव्या हाताने थाप मारायची आहे. थाप मारत असताना त्या व्यक्तीचे नाव घेऊन तुमचे पैसे परत येण्याची इच्छा व्यक्त करा.

मित्रांनो यानंतर एखाद्या सुनसान ठिकाणी जिथे लोक येत जात नाहीत अशा निर्जन ठिकाणी मोठ्या दगडाखाली हे पत्र ठेवा, जास्तीत जास्त वजन ठेवून हे पत्र दबले जाईल याचा विचार करा. तसेच शक्य झाल्यास त्या व्यक्तीची कोणतीही वस्तू या भोजपत्रासहित ठेवल्यास त्याचा परिणाम दुप्पट वेगाने होतो व लाभ लवकर होतो.

आपला हा उपाय केल्याने त्या व्यक्तीला कोणतेही नुकसान होत नाही, तर त्या व्यक्तीस तुमचे पैसे परत देण्याचा विचार सता वतो, ती व्यक्ती तुमचे पैसे भागवण्यासाठी तत्पर राहते व प्रयत्न करून पैसे परत करते.

मित्रांनो यामागे कोणतीही अं ध श्रद्धा नसून फक्त एक उपाय आहे जो स्वतःच्या व इतरांच्या भल्याचा आहे. फक्त एकच काळजी घ्यावी लागेल की हे करताना तुमच्या मनात जास्तीत जास्त सकारात्मक विचार असू द्या.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here