नमस्कार मित्रानो,
मित्रानो हा प्रश्न कित्येक लोकांच्या मनात असेल कि आम्ही मांसाहार करतो मग आम्ही स्वामी सेवा कशी करावी? मित्रानो आपल्याला स्वामी सेवा किंवा इतर देवी देवतांच्या सेवा करायच्या असतात. परंतु कितीही नाही म्हटलं तरी मांसाहार हा अडथळा बनून मध्ये येतोच.
कित्येक जणांच्या मनात शंकांच वादळ निर्माण होत. आम्ही मांसाहार करतो मग सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही परंतु घरातील बाकी मंडळी करतात. मग अशा परिस्थितीत मी काय करायचं? या दिवशी स्वामी सेवा कशी करायची? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात.
मित्रांनो अशुद्ध मनाने सेवेत लक्ष लागण थोडं कठीणच आहे. भूक लागली कि खाणे हे प्रत्येक सजीवाला लागू पडते. मनुष्य जे काही करतो ते पोटासाठीच. पण मग शाकाहार योग्य आहे कि मांसाहार योग्य आहे? स्वामी सेवा करताना मांसाहाराचा अडथळा कसा येतो ते आज आपण जाणून घेऊया.
मित्रानो वर जसे म्हटले कि स्वामी सेवेत मांसाहार कसा अडथळा बनतो, याचा अर्थ असा नाही कि आम्ही मांसाहाराच्या विरुद्ध आहोत. योग्य काय आणि अयोग्य काय हे आम्ही तुम्हाला सांगत नाही आहोत तर मांसाहार स्वामी सेवेत कसा अडथळा बनतो हे तुम्हाला सांगणार आहोत.
मित्रानो प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी सेवा करायची असतेच. पण मांसाहार या शब्दामुळेच आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्याला मनापासून वाटत कि सेवा करावी आणि दुसरीकडे असा अशुद्ध भाव नकोसा पण वाटतो.
जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याच शंका कुशंका नसतात. पण जेव्हा तुम्ही मांसाहार करता तेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या स्वतःला अयोग्य समजता. आणि अशा वेळेत जर तुम्ही स्वामी सेवा, स्वामी भक्ती करत असाल तर ती अयोग्यच वाटणार.
जेव्हा घरात मांसाहार होतो तेव्हा घरातील वातावरण बदलेल तुम्हाला नक्कीच जाणवेल. घरात अशांतता निर्माण होईल, कदाचित वाद सुद्धा होतील. आणि म्हणूनच मांसाहार हा सेवेतील अडथळाच आहे. मग आता करायचं काय?
मित्रानो तुम्ही जेव्हा मांसाहार करत असाल तेव्हा सेवा न केलेलीच बरी. आणि तो दिवस स्वामी सेवे बिना व्यर्थ गेला असे समजावे. कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले आहे कि ज्या दिवशी तुमच्या हातून पुण्य घडत नाही तो दिवस वाया जातो. परंतु मित्रानो यम हा निर्दयी आहे त्यामुळे पुण्य करणे जरुरी आहे.
मित्रांनो ज्या दिवशी मांसाहार कराल तो दिवस स्वामी सेवे शिवाय व्यर्थ गेला असे समजावे. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले. पण आपण आपल्या मनालाच प्रश्न करायचा कि आपण मांसाहार केलेला स्वामींना आवडत असेल का? याच उत्तर तुम्ही स्वतःच शोधा. याच संदर्भातली स्वामींच्या काळात घडलेली गोष्ट पुढे वाचा.
स्वामी अक्कलकोट मध्ये वाटेल तिकडे बसत, वाटेल तिकडे फिरत, वाटेल तिथे भोजन करत असत. एके दिवशी फिरत फिरत स्वामींची स्वारी एका राजवाड्यात जाते. स्वामींना समोर पाहून राजे आनंदित होतात आणि देवघरापुढे असलेल्या झोपाळ्यावर स्वामींना बसण्यास सांगतात.
स्वामींची व राजांची चर्चा चालू असते. त्याचवेळी देवघरात आप्पा पुजारी गंध उगाळीत बसलेला असतो. त्याचवेळी एक उंदीर येऊन निरंजनातील वात खाऊ लागतो. हे पाहून आप्पा पुजार्याला फार राग येतो. दररोज वात खात असल्यामुळे आप्पा पुजारी वैतागलेलाच होता.
रागारागातच गंध उगळण्याचे खोड हातात घेतो व त्या उंदराच्या दिशेने फेकून मारतो. तो खोड बरोबर जाऊन त्या उंदराला लागतो. परिणामी उंदीर जागेवर मरण पावतो. आप्पा खुश होऊन त्याची शेपटी पकडतो व त्याला घेऊन देवघराबाहेर पडतो.
आप्पाच्या हातातील उंदीर पाहून स्वामी त्याला बोलतात काय रे आप्पा उंदराचा फारच त्रास होत होता वाटत तुला? मारलेच एकदाचे त्या बिचाऱ्या उंदराला. अरे काय खात होता तो? नुसती वातच ना? स्वामींचा राग पाहून आप्पा सुलभ घाबरतो. त्याला काय बोलावं काही सुचत नाही.
स्वामी पुढे म्हणतात आन तो उंदीर इकडे. आप्पा सुलभ घाबरत घाबरतच तो उंदीर स्वामींकडे नेऊन देतो. स्वामी झोपाळ्याच्या कडीतून चार पाच वेळा त्या उंदराला इकडे तिकडे करतात. आणि हसत त्या उंदराला बोलतात चल उठ, जा बच्चा भाग जाओ अब.
आश्चर्य काय तर स्वामींचा शब्द ऐकताच मेलेला उंदीर जिवंत होतो व ताडकन उडी मारून निघून जातो. हे पाहून आप्पांच्या जीवात जीव येतो. तो स्वामींच्या पाया पडतो व चुकलो स्वामी मला माफ करा म्हणून गयावया करतो.
त्यावर स्वामी म्हणतात अरे हि सारी श्रुष्टि मी निर्माण केली आहे. जसे तुम्ही माझी लेकरे आहात तसेच हे किडे, मुंग्या, पशु, पक्षी हे सुद्धा माझी लेकरेच आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा माझीच आहे.
तुम्ही माणसं या छोट्या प्राण्यांना शुल्लक समजत असाल रे पण तसे नाहीये. त्यांना सुद्धा या पृथ्वीवर महत्व आहे कि. पण तुम्हाला याची जाणीव कधी होणार कुणास ठाऊक. असे बोलून स्वामी राजवाड्यातून तडक बाहेर पडतात.
मित्रानो तुम्हाला हि कथा सांगण्याचा आमचा उद्देश एव्हाना लक्षात आला असेलच. आपल्याला स्वामी सेवा करायची असेल तर मांसाहार केलेला स्वामींना आवडेल का? विचार करा यावर. स्वतःलाच प्रश्न विचारा आणि उत्तर शोधायचा प्रयन्त करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.