नमस्कार मित्रानो, श्री स्वामी समर्थ,
मित्रानो आज 2 जुलै शुक्रवारचा दिवस. शुक्रवारचा दिवस हा माता महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. लक्ष्मी मातेला धनाची देवी म्हणून ओळखले जाते. लक्ष्मीची कृपा बरसली तर सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने आपले आयुष्य बहरून येते.
माता लक्ष्मीची जेव्हा कृपा बरसते तेव्हा आयुष्यत कुठलीच गोष्ट अवघड वाटत नाही. मित्रानो आपल्या स्वामींमध्ये तर प्रत्येक देवी देवतांचे अवतार आहेत. ते परब्रम्ह आहेत. म्हणून आपण त्यांची सेवा नित्य नियमाने करावी.
आपण रोजच्या प्रमाणे आज सुद्धा स्वामींची विशेष सेवा करायची आहे. मित्रानो हि सेवा करताना तुम्हाला एका मंत्राचा फक्त 21 वेळेस जप करायचा आहे. हो मित्रानो फक्त 21 वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे.
सकाळी, दुपारी, संध्याकाळी म्हणजे दिवसातून केव्हाही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. महिला असेल, पुरुष असेल, शिक्षण घेणारी पिढी असेल अगदी कोणीही हा मंत्र जप करू शकतो.
यासाठी मित्रानो सर्वप्रथम हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून स्वामींच्या समोर बसायच आहे. अगरबत्ती, दिवा लावायचा. स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आणि त्यानंतर हा मंत्र जप सुरू करायचा.
आता हा मंत्र कोणता आहे? मित्रानो हा मंत्र स्वामी समर्थांच्या अष्टनामावली मधला म्हणजे स्वामींचे जे 108 मंत्र आहेत त्यातला हा एक मंत्र आहे. तर या मंत्राचा जप तुम्हाला न विसरता करायचा आहे.
मित्रांनो हा मंत्र म्हणजे ओम गुरुलीलामृतधारकाय नमः, ओम गुरुलीलामृतधारकाय नमः मित्रानो हा मंत्र स्वामींचा अगदी चमत्कारी मंत्र आहे. याचा जप केल्याने स्वामी प्रसन्न होतात. त्यांची कृपा आपल्यावर बरसते. स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
सर्व दुःख, अडचणी, समस्या, संकट स्वामी दूर करतात. तर मित्रानो तुम्ही सुद्धा स्वामींच्या या विशेष सेवेमध्ये सहभागी व्हा. स्वामींची हि सेवा घरच्या घरी राहून नक्की करा. अगदी सोप्पी सेवा आहे. फक्त 21 वेळेस तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.