स्वामी समर्थांना आवडतात या 5 गोष्टी… जो भक्त पाळतो त्याला लवकरच होते स्वामी भेट…

0
2122

नमस्कार मित्रांनो,

आपल्या स्वामींना या 5 गोष्टी अगदी मनापासून आवडतात. आणि जो भक्त या गोष्टी पाळतो, आचरणात आणतो अश्या व्यक्तीला स्वामी लवकरच भेट देतात. आणि त्याचे सर्व संकट हरतात. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या गोष्टी आचरणात आणा. स्वामींशी भेट होईल, लवकरात लवकर सर्व इच्छा पूर्ण होतील. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी.

स्वामींची सगुण उपासना

मनापासून, मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे हि एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे. अशा सगुण उपासनेला आणि या सेवेला स्वामी प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

तर मित्रांनो तुम्ही सुद्धा स्वामींची मनापासून मनोभावे सगुण उपासना करा, त्यांची मनापासून सेवा करा. स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन देतील.

अन्नदान करणे

अन्नदान करणे म्हणजे सर्वात मोठे पुंण्याचे काम आहे. लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्यातरी खास दिवशी, सणासुदीला करतात. जेणेकरून त्याचे फळ आपल्याला मिळावे, पण हे अत्यंत चुकीचं आहे.

अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे. निदान एक भाकरी, एक चपाती जे असेल ते आपण एखाद्या गरिबाला देऊच शकतो. मागणारा कोणी गरीब आला तर त्याला नक्की अन्नदान करा. अन्नदान करणे हि गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे.

स्वामींचे नामस्मरण

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल श्री स्वामी समर्थ या नामात या मंत्रात किती शक्ती आहे. या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सर्व संकट हरतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

माणूस जोडण्याची हौस

माणूस जोडण्याची हौस म्हणजेच जनप्रियता. प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे, मोठ्याचा आदर करणे, सर्वांना समान प्रेम देणे, कोणाचाही तिरस्कार न करणे या गोष्टी जो पण व्यक्ती पाळतो स्वामी त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होतात.

परिस्थिती

मित्रांनो आपली जी परिस्थिती असेल त्यात समाधानी राहायला शिकले पाहिजे. म्हणजेच आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंदी जीवन जगायचं. जास्त मिळेल याची अपेक्षा ठेवायची नाही, जे आहे त्याबद्दल रडायचं नाही. जे दिले आहे ते देवाने दिले आहे त्यातच आनंदात राहून आपण आपले जीवन जगायचे.

तर मित्रांनो या 5 गोष्टी आहे या लक्षात ठेवा आणि त्या रोजच्या जीवनात आचरणात आणा. या गोष्टी आचरणात आल्या कि स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतातच. आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तर मित्रांनो अगदी सोप्प्या गोष्टी आहेत म्हणून या गोष्टी नक्की पाळा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here