नमस्कार मित्रांनो,
एक चार वर्षांची चिमुरडी एकदा आईबरोबर बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे गेली काही तपासणी करून घेण्यासाठी. डॉक्टरांनी जेव्हा दुर्बि णीच्या साहाय्याने तिच्या कानाची तपासणी केली तेव्हा त्यांनी विचारलं,
“तुला काय वाटतं. मला एखादा मोठा पक्षी आढळेल का तुझ्या कानात?’’
ती आपली गप्पच राहिली.
नंतर डॉक्टरांनी एका यंत्राने तिची जीभ दाबून धरून घसा तपासला.
“आता घशात मला डायनासोर दिसेल का गं?”
डॉक्टरांनी तिला विचारलं पण काही न बोलता ती तशीच मुकाटपणे बसून राहिली.
त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या छातीवर हृदयाचे ठोके मोजायला यंत्र ठेवलं व ते ठोके ऐकू लागले. ऐकता ऐकता ते म्हणाले,
“इथे मात्र मला नक्कीच ‘कोकिळा’ पक्षाचा आवाज ऐकायला येणार बरं का!”
ती मुलगी ते ऐकताच अचानक म्हणाली.
“मुळीच नाही!”, “कोकिळा’चं चित्रं माझ्या पेटिकोटवर आहे डॉक्टर, माझ्या हृदयात तर स्वामी समर्थ आहेत.
मित्रांनो ही सुंदर कथा आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच स्वामी भक्तीच्या कथा, राशिभविष्य विषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आत्ताच आपले स्टोरी वाले बाबा हे फेसबुक पेज लाइक करा.