सूर्याचे कन्या राशीत गोचर.या राशी होणार मालामाल तर या राशींना करावा लागणार संकटांचा सामना

0
244

नमस्कार मित्रानो

मित्रांनो आज म्हणजेच 16 सप्टेंबर 2021 रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल. सूर्य देव हा नऊ ग्रहांपैकी सर्वात मोठा ग्रह मानला जातो. असे मानले जाते की जर कुंडलीत सूर्य बलवान असेल तर नशीब अगदी वाऱ्याच्या वेगाने धावत. रोग्य देखील चांगले राहते .तसेच जर सूर्य कमकुवत स्थानी असेल तर आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

म्हणजेच आपल्या राशीमध्ये सूर्याची उपस्थिती आणि त्याचे स्थान खूप महत्वाचे आहे. सूर्याच्या कन्या राशीत होणाऱ्या गोचरामुळे काही राशींवर या गोचराचा सकारात्मक प्रभाव पडणार असणार तरी काही राशींना मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण 12 राशींबद्दल.

मेष रास

ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांचा सूर्य हा पाचव्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या सहाव्या घरात प्रवेश करेल. हे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी चांगले राहील. या काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल आणि तुमच्या कामात यशस्वी व्हाल, म्हणजेच तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. कार्यक्षेत्रात सर्व गोष्टी चांगल्या होतील. जर आधीच कोणती समस्या असेल तर ती दूर होईल , ज्यामुळे मन आनंदी राहील.

वृषभ रास

सूर्य वृषभ राशीच्या लोकांच्या चौथ्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या पाचव्या घरात प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रानुसार या काळात तुम्हाला काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहणार नाही. या काळात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. कार्यक्षेत्रात, तुमच्या वरिष्ठांशी काही मुद्द्यांमुळे तुमचे वाद होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. वरिष्ठांचे तुमच्या प्रति वर्तणूक धारदार आणि टोमणे रहित असू शकते.

मिथुन रास

सूर्य मिथुन राशीच्या लोकांच्या तिसऱ्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या चौथ्या घरात प्रवेश करेल. जर तुमच्या घरात बराच काळापासून जुना वाद असेल तर या काळात सर्व सदस्यांशी बोलून वाद मिटू शकतो. त्यासाठी तुम्हाला खुलेपणे मन मोकळेपणे बोलावे लागेल. जर तुमच्या शिक्षणात पूर्वी कोणत्याही प्रकारचा अडथळा आला असेल आणि तुम्हाला तुमचे शिक्षण परत सुरू करायचे असेल तर वेळ अगदी उत्तम आहे.

कर्क रास

सूर्य कर्क राशीच्या लोकांच्या दुसऱ्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या तिसऱ्या घरात असेल. हे गोचर तुमच्यासाठी चांगले परिणाम देणारे ठरेल , कारण या काळात तुम्ही तुम्ही धैर्य आणि सामर्थ्याने परिपूर्ण असाल आणि तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात गती मिळेल. तुमचे संवाद , कौशल्य आणि इतरांना पटवून देण्याची क्षमता तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जाईल.

सिंह रास

सूर्य सिंह राशीच्या लोकांच्या पहिल्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या दुसऱ्या घरात असेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून पैशाची वाट पाहत असाल, तर या काळात धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तुम्ही जोखमीच्या कामाद्वारे पैसे कमवू शकता. ज्यांच्या कुंडलीत सूर्य अनुकूल स्थितीत आहे अशा लोकांना हे गोचर अतिशय लाभदायक ठरणार आहे. दरम्यान या काळात वाणी मध्ये गोडवा निर्माण होईल.

कन्या रास

सूर्य सिंह राशीच्या लोकांच्या बाराव्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या पहिल्या घरात असेल. या कालावधीत, सूर्याचे हे गोचर तुमच्या आर्थिक बाजूने चांगले राहणार नाही. या गोचरामुळे तुम्हाला नफा मिळवण्यात अडचणी येऊ शकतात, यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. परिणामी तुमचे मन अस्वस्थ राहील. व्यावसायिकांना निर्णय घेण्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

तूळ रास

सूर्य तूळ राशीच्या लोकांच्या अकराव्या घराचा स्वामी आहे. या काळात तुमचा पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी जेमतेम असेल. या काळात तुम्हाला दीर्घकालीन प्रकल्प पूर्ण करण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही समाजापासून थोडे अंतर ठेवू शकता. हे गोचर तुमच्या शिक्षणात समस्या निर्माण करू शकते आणि तुम्हाला एकाग्र होण्यात अडचणी येऊ शकतात.

वृश्चिक रास

सूर्य वृश्चिक राशीच्या लोकांच्या दहाव्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या अकराव्या घरात असेल. सूर्याचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल, कारण या काळात तुमचे सामाजिक संबंध मजबूत बनतील. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात लाभ होईल. या काळात तुम्हाला यश आणि प्रसिद्धी मिळेल आणि योग्य मार्गाने संपत्ती मिळेल.

धनु रास

ज्योतिष शास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी, सूर्य नवव्या घराचा स्वामी आहे आणि आणि आता तो तुमच्या दहाव्या घरात असेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुम्हाला कामात आनंद वाटेल. तुम्हाला नोकरीमध्ये वाढ आणि प्रगतीची संधी मिळण्याची शक्यता आहे.

मकर रास

ज्योतिष शास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी, सूर्य हा आठव्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या नवव्या घरात असेल. या कालावधीत मकर राशीच्या लोकांना खूप सावधगिरी बाळगावी लागेल कारण या काळात तुमच्या कोणत्याही विश्वासू व्यक्तीकडून तुमची फसवणूक होऊ शकते, म्हणून सावध राहा. फसवणूक झाल्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. तुम्हाला अडचणींचा सामना सुद्धा करावा लागू शकतो.

कुंभ रास

सूर्य कुंभ राशीच्या लोकांच्या सातव्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या आठव्या घरात असेल. आठवे घर अचानक नुकसान / लाभ आणि मृत्यूचे घर असल्याचे म्हटले जाते. या दरम्यान या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिक जीवनात, यांना त्यांच्या वरिष्ठांचा पाठिंबा मिळणार नाही . कामात राजकारण होणार नाही याची काळजी घ्या.

मीन रास

ज्योतिष शास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य सहाव्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या सातव्या घरात असेल. मीन राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या विरोधकांमुळे काही अडचणी येऊ शकतात आणि तुम्ही तुमचा बहुतेक वेळ इतरांशी स्पर्धा करण्यात घालवू शकता. तुमच्या जोडीदाराशी आणि इतर लोकांशी संबंध देखील या काळात फार चांगले असतील असे म्हणता येणार नाही.आपल्या जीवनसाथीबरोबर अहंकाराच्या संघर्षाची शक्यता आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here