सूर्याचे सिंह राशीत गोचर. या ४ राशींची लागणार लॉटरी तर या राशींचे भारी नुकसान.

0
278

नमस्कार मित्रानो

सिंह राशीत सूर्याचा प्रवेश म्हणजे जणू शक्ती प्रदर्शन. सिंह राशी हि सूर्याची स्वतःची राशी आहे. म्हणून या राशीमध्ये सूर्याचे गोचर मजबूत स्थिती दर्शवतो. सूर्याचा प्रभाव व्यक्तीला कीर्ती आणि शक्तीने भरून टाकतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य राजसिक गुण दर्शवितो. सूर्याचा प्रकाश आणि त्याच्या तेजाने एखाद्या व्यक्तीचे मार्ग मोकळे होतात , अडथळे दूर होतात.

मेष रास

मेष राशीत सूर्य पाचव्या घरात असल्याने व्यक्तीला यावेळी त्याच्या प्रेम प्रकरणांबद्दल थोडे जागरूक असणे आवश्यक आहे. यावेळी वाद उद्भवू शकतात. विद्यार्थ्यांना मात्र हा काळ सुखाचा असेल. या काळात सकारात्मक परिणाम परीक्षेत दिसून येतील. नवीन मित्र मैत्रिणी या काळात बनतील. कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य चौथ्या घरात प्रवेश करत आहे. जेव्हा सूर्य या स्थानी असतो तेव्हा त्याचा तुमच्या कार्यक्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या चौथ्या आणि दहाव्या घरावर सूर्याचा प्रभाव आहे. या काळात कुटुंबातील लोकांशी वाद होऊ शकतो. पालकांच्या सहकार्या अभावी समस्या निर्माण होतील, परंतु कामाच्या ठिकाणी परिस्थिती सकारात्मक राहू शकते.

मिथुन रास

मिथुन राशीच्या तिसऱ्या घरात सूर्य गोचर करणार आहे. या काळात तुमच्या मेहनती मध्ये वाढ दिसून येईल. आता समाजात पद्प्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ होईल. तुम्हाला प्रवासाच्या संधी मिळतील आणि तुम्ही लोकांशी जुळवून घेऊ शकाल. तुम्ही सामाजिकदृष्ट्या खूप व्यस्त रहाल आणि धार्मिक क्षेत्रात तुमची भूमिकाही महत्त्वाची असेल.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर त्यांच्या संपत्तीवर सकारात्मक परिणाम करेल. आर्थिक लाभाची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात विस्तार करण्यासाठी हा काळ चांगला असेल. या काळात एखादे मोठे कर्ज मंजूर होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबात तुमची उपस्थिती महत्त्वाची ठरेल. बोलताना भान ठेवून बोलणे अत्यंत आवश्यक आहे नाही तर नुकसान होण्याची शक्यता आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना आर्थिक क्षेत्रात काही चांगल्या संधी मिळू शकतात. या वेळी तुम्ही प्रवासात अधिक व्यस्त राहण्याची शक्यता आहे. नवीन नात्याची सुरुवात या काळात होऊ शकते. उच्च शिक्षणासाठी वेळ अनुकूल आहे. वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन देखील तुमच्यासाठी चांगले ठरेल.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ क्षेत्रात नवीन संधी निर्माण करून देणारा काळ ठरू शकतो. स्पर्धा जास्त असणार आहे, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. तुम्ही इतरांच्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले नाही तर ते चांगले होईल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.

मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक आणि फॉलो करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here