नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो सुपारी मध्ये श्री गणेशांचा वास असतो. जेव्हा एखाद शुभ कार्य असत लग्न, सत्यनारायण पूजा, होम हवन कोणत्याही प्रकारची पूजा असेल त्या ठिकाणी गणपतीचं स्वरूप म्हणून सुपारी ठेवली जाते.
आज आपण या सुपारीचा एक उपाय पाहणार आहोत. जो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो. मित्रांनो तुम्हाला या सुपारीचा उपाय सलग सात दिवस करायचा आहे.
एक लक्षात ठेवा सकारात्मक विचार मनात ठेवूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो उपायासाठी आपल्याला फक्त एक सुपारी घ्यायची आहे. खाण्याची सुपारी आणि पूजेची सुपारी या दोन्ही सुपारी वेगवेगळ्या असतात.
पूजेसाठी जी सुपारी वापरली जाते तीच सुपारी आपल्याला वापरायची आहे. हि सुपारी पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला सहज मिळेल. मित्रांनो उपायासाठी नवी कोरी सुपारी आपल्याला घ्यायची आहे. पूजेमध्ये आधी वापरलेली सुपारी या उपायासाठी वापरू नका.
मित्रांनो हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवसापासून सुरु करायचा आहे. सर्वात आधी सुपारीला दुधाने आणि नंतर पाण्याने अभिषेक घालायचा आहे. आणि त्या नंतर हि सुपारी आपल्याला आपल्या देवघरात ठेवायची आहे.
गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा तिन्ही सांजेला हा उपाय तुम्ही करू शकता. आता या सुपारीची पुढील सात दिवस धूप बत्ती, हळद, कुंकू लावून पूजा करायची आहे. मित्रांनो हि सुपारी म्हणजे साक्षात श्री गणेश आहेत अशी भावना ठेवून आपल्याला पूजन करायचे आहे.
मित्रांनो 7 दिवस झाल्यानंतर 8 व्या दिवशी हि सुपारी आपल्या तिजोरीत जिथे आपण आपल्या मौल्यवान वस्तू, दागदागिने ठेवतो त्या ठिकाणी कायम स्वरूपी ठेवून द्यायची आहे. तुमचं दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात तुम्ही हि सुपारी ठेवू शकता.
मित्रांना आपण कितीही कष्ट केले, मेहनत केली तरी जोपर्यंत नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कार्यात यश मिळत नाही. परंतु हा उपाय केल्यानंतर नशिबाची साथ तुम्हाला मिळू लागेल.
जिथे श्री गणेशाचं वास्तव्य असत तिथे प्रत्येक कार्यात यश मिळत. जर एखाद्या कार्यात तुम्हाला अडचणी येत आहेत, कार्य पूर्ण होत आलय असं वाटत असताना अगदी थोड्यासाठी अडथळे निर्माण होत असतील, अपयश येत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा.
तुमची अर्धवट राहिलेली कामे नक्कीच पूर्ण होतील. तुमचं नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल. गणपती बाप्पा तुमची सर्व कामे निर्विघन पणे पार पाडतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.