नमस्कार मित्रांनो,
16 ऑगस्ट 2010 साली श्रीलंकेत त्रिकोणीय शृंखला सुरु होती. त्या सिरीज मधील ती तिसरी मॅच होती. श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट आला.
श्रीलंकेची पूर्ण टीम 170 रन करू शकली. दिलशान चे 45 रन आणि सूरज रनदीव 43 या दोघांना सोडले तर कोणीच चांगले प्रदर्शन त्या सामन्यात करू शकले नव्हते.
भारताकडून प्रज्ञान ओझा 3 विकेट आणि इशांत शर्मा , प्रवीण कुमार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्यानतंर आली भारताची बॅटिंग. दिनेश कार्तिक फक्त 10 रन करून आउट झाला.
भारताचे 30 रन झाले होते आणि पहिला झटका कार्तिकच्या रूपाने बसला. पण खरी समस्या तर त्या नंतर उदभवली कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली खाता न उघडताच शून्यावर आउट झाले.
10.4 ओव्हर मध्ये भारताचे 32 रनवर 3 विकेट होत्या. त्यानंतर रैना आणि सेहवाग यांनी थोडा फार चांगला खेळ सुरु ठेवला. भारताचा स्कोर 91 होता तेव्हा रैना आऊट झाला.
पण दुसऱ्या बाजूने सेहवाग टिकून होता. 34 ओव्हर झाल्या तेव्हा सेहगाव खेळत होता 99 रन्स वर. आता वेळ आली होती 35 व्या ओव्हरची. सुरज रनदीवच्या स्पेलची आठवी ओव्हर.
सेहवाग 99 रन्स वर स्ट्राईक वर होता. ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सेहवाग ने एक मोठा षटकार मारला. सर्वांना वाटले कि सेहवागचे शकत झाले. पण तेवढ्यात अंपायरने तो बॉल नो बॉल म्हणून इशारा केला.
पहा व्हिडीओ
भारत ती मॅच जिंकला होता मात्र सेंचुरी हुकली. सेहवाग ने मॅच नंतर सांगितले कि क्रिकेट मध्ये अशा गोष्टी होतच राहतात. समोरच्या टीमची कधीच इच्छा नसते कि त्यांच्या विरुद्ध कोणी शतक करावं.
मित्रानो सुरज रणदिव ने तो नो बॉल मुद्दाम टाकला होता जेणेकरून सेहवागचे शकत होणार नाही. पण या मॅच नंतर त्याच्यावर पुढील एक मॅच न खेळण्याचा दंड लावला गेला.
दिलशानची त्या दिवसाची इन्कम पण दिली गेली नाही कारण रणदिवला दिलशाननेच नो बॉल टाकायला सांगितले होते. नंतर रणदिव ने सेहवागची माफी सुद्धा मागितली.
या सामन्याला आता जवळजवळ 11 वर्ष होतील. आता तोच सुरज रणदिव ऑस्ट्रेलिया मध्ये बस ड्रॉयव्हरची नोकरी करतोय असे उघडकीस आले आहे.
मित्रांनो अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.