नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तसे तर प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते. परंतु जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात.
या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे आपल्या कुंडलीतील ग्रहदोष नष्ट होतो व आपले पित्र शांत व प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. सोमवारी अमावस्या आल्यास त्या दिवशी काही उपाय केल्याने छोट्या छोट्या संकटांपासून आपली सुटका होते.
सोमवती अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाचे व दानाचे फार महत्व आहे. या दिवशी पित्रांसाठी तर्पण करणे खूप शुभ मानले जाते. पितरांना तर्पण करताना त्या पाण्यात काळे तीळ टाकावे.
जर आपण स्वतः किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य वारंवार आजारी पडत असतील, स्वास्थ्याचा काही प्रॉब्लम असेल तर पित्रांकडे प्रार्थना करावी व काळ्या तिळाचे दान करावे.
तसे तर प्रत्येक दिवशी मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे पुण्याचे काम समजले जाते. परंतु सोमवती अमावस्येच्या दिवशी मूक जीवांना काही खायला दिल्यास त्याचे फळ आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळते.
सोमवती अमावस्येच्या दिवशी फक्त गायचं नाही तर कोणताही उपाशी जीव आपल्याला दिसला तर आपण त्याला काहींना काही खायला जरूर द्यावे. गरिबांना भोजन द्यावे. पक्षांना दाणे टाकावे. तलावातील माशांना पीठ व साखर मिक्स करून त्याचे गोळे करून खायला द्यावेत.
मुंग्यांना साखर टाकावी. असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्यांचा अंत होतो. आपल्या कुंडलीतील सर्व दोष दूर करण्यासाठी व पित्र देवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी सोमवारी गाईला हिरवा चारा खायला द्यावा.
तसेच एक ताजी पोळी घेऊन त्या पोळीला शुद्ध तूप लावून त्यावर थोडासा गूळ व काळे तीळ टाकून ती पोळी गाईला खायला द्यावी. गाईला हिरवा चारा, तीळ, गूळ व पोळी खायला देताना अशी प्रार्थना करावी कि आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे हरण व्हावे.
आपल्या कुंडलीतील सर्व दोष नष्ट होऊन पितरांची शांती व्हावी व पितृदोष संपून आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळावेत. या उपायामुळे आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी व संकटांपासून आपली मुक्तता होईल. आपले जीवन सुखी समृद्ध व संपन्न बनेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.