शास्त्रानुसार या 7 कारणामुळे साप मनुष्याला दंश करतो…

0
404

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्मात सापाला खूप मोठे महत्व प्राप्त आहे. भारतात अनेक ठिकाणी नागदेवतेची मंदिरे देखील आहेत. वर्षातून एकदा येणारा नागपंचमी सण खूप मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो.

बहुतेकांच्या घरातच नागदेवतेची पूजा केली जाते. सापाला सर्व सामान्य मनुष्य घाबरतो पण सर्प मित्र मात्र त्यांच्याशी मैत्रीच्या भावनेने व्यवहार करतात. काही जण तर टीव्ही मध्ये साप बघितला तरी घाबरून जातात.

सापाच्या चाव्याने दरवर्षी कित्येक लोक मृ त्युमुखी पडलेले तुम्ही ऐकले असेल. जंगलांची तोडफोड करून मनुष्य वन्य प्राण्यांच्या वस्तीत राहू लागला आहे. हिरवी गार जंगले तोडून सिमेंट काँक्रीटची जंगले उभारली जाऊ लागली आहेत.

परिणामी वन्य प्राणी मानवी वस्ती मध्ये आसरा शोधू लागले आहेत. त्यामुळे तुम्ही कित्येकदा मानवी वस्ती मध्ये साप पाहिला असेल. तस पाहायला गेले तर प्रत्येक साप हा विषारी नसतो पण सापाची भीती मात्र सर्वांच्या मनात घर करून असते.

विषारी सापाचा एक थेंब सुद्धा मनुष्य जीवन संपवू शकतो. विषारी साप चावल्यानंतर उपचार वेळेवर झाला नाही तर मनुष्याला आपला प्राण गमवावा लागतो. सर्पदंशामुळे मृ त्यू झाल्याच्या बातम्या आजवर तुम्ही खूप ऐकल्या सुद्धा असतील.

मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल कि साप कोणत्याही कारणाशिवाय मनुष्याला चावट नाही. शास्रात अशी काही कारणे सांगितली आहेत ज्यामुळे सर्प मानवाला दंश करू शकतो. चला तर मग जाणून घेऊ कोणती आहेत ती कारणे.

कुंडली दोष

शास्त्रानुसार जर कुंडलीमध्ये सर्प दंशाने मृ त्यू होणार असे नमूद असेल तर त्या व्यक्तीला सर्प दंशापासून कोणीही वाचवू शकत नाही. साप चावल्यानंतर वेळेवर उपचार जरी झाला आणि त्यातून तो व्यक्ती वाचला तरी पुढे जाऊन त्याचा मृ त्यू हा सर्पदंशानेच होणार.

वाटेतील साप

साप सरपटत असताना कधीच कोणाला चावत नाही. जर मनुष्य चालत असताना चुकून सापावर पाय पडला तर मात्र नक्कीच दंश करतो. मनुष्याचा पाय चुकून पडलाय हे त्याला कळत नाही. उलट मनुष्य आपल्यावर हल्ला करतोय असे त्याला वाटते म्हणून तो चावतो.

स्वरक्षण

बऱ्याचदा सापाला बघितल्यावर बरेच जण त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मनुष्याला चावण्या व्यतिरिक्त त्याच्याकडे दुसरा कोणता पर्याय उरत नाही.

कुटुंब रक्षण

मित्रांनो मनुष्य असो किंवा प्राणी दोघेही परिवाराची रक्षा करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. असच पारिवारिक प्रेम सापांमध्ये पण असते. जर तुम्ही सापाच्या पिल्लांना किंवा त्यांच्या समूहातील एखाद्या सापाला मारण्याचा प्रयन्त केला तर त्या बदलत्यात ते तुम्हाला दंश करू शकतात.

उन्माद करणारा साप

बऱ्याचदा साप काही ठराविक जनावरांसारखे उन्माद करणारे किंवा वेडे असतात. अशात या सापांसमोर एखादे मोठे जनावर जरी आले तरी ते त्याचा विनाकारण चावा घेतात. अशा उन्मादी सापांची संख्या खूपच कमी आहे. असे साप समोर मनुष्य असो कि जनावर दंश नक्की करतात.

उपाशी साप

बहुतांश साप मनुष्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण जर साप उपाशी असेल तर तो रागात भूक मिटावी म्हणून मनुष्याला दंश करू शकतात. मनुष्य सुद्धा राग आल्यावर दातावर दात घासतात. सापांचा स्वभाव पण या बाबतीत मनुष्य स्वभावाशी मिळता जुळता आहे.

सापाचे जोडपे

अशी मान्यता आहे कि सापाच्या जोडप्यातील एकाची जरी हत्या केली तर त्या सापाचा साथी त्या हत्येचा बदला जरूर घेतो. मनुष्य कुठेही असो त्याला शोधून कशाही प्रकारे तो जरूर डसतो आणि बदला घेतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण मनोरंजक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

नोट : वरील माहिती हि ज्योतिषशास्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी सर्पतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here