नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये एकूण सोळा संस्कार असतात आणि याला अनुसरून माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर शेवटचा संस्कार म्हणजे सोळावा संस्कार केला जातो. मित्रांनो तुम्हीदेखील अनेक अंतिम संस्काराचा हिस्सा बनले असाल.
तुमच्या मनात देखील कधी ना कधी हा प्रश्न आला असेल की जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा महिलांना स्मशानात का जाऊ दिलं जात नाही? आपण याबद्दलच आज जाणून घेणार आहोत. काय कारण असेल ज्यामुळे महिलांना स्मशानात जाणे वर्ज्य आहे. याचे वर्णन गरुड पुराणात विस्तारित रूपात आढळते.
मित्रांनो, गरुड पुराणानुसार महिलांना पुरुषांच्या तुलनेने कमजोर, हळव्या मनाचे मानले जाते. मृत व्यक्तीला अग्नी देते वेळी जर कोणी रडत असेल तर त्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभत नाही, अशी मान्यता आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक सौम्य असतात. अशा नाजूक वेळी त्यांच्या रडण्याची संभावना जास्त असते. हेच कारण आहे महिलांना स्मशाना पासून दूर ठेवले जाते. महिलांच्या डोळ्यातून लवकर अश्रू निघतात हे तुम्ही देखील निरीक्षण केले असेल. त्या लवकर दुःखी होतात.
अशामध्ये जर मृत व्यक्ती महिलेच्या जवळची असेल तर त्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभण्यात बाधा येऊ शकते. आणि मृत व्यक्तीची आत्मा भटकती राहू शकते म्हणून महिलांना स्मशानात जाण्यास मनाई केली जाते.
अनेक वेळा पार्थिव जळते वेळी कडकड असा आवाज येतो, कवटी फुटते. ज्यामुळे महिला लवकर घाबरू शकतात म्हणून त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवणे उचित समजले जाते. स्मशान भीती दायक जागा मानली जाते.
अग्नी देतेवेळी अशा काही विधी असतात जे महिला व लहान मुले पाहू शकत नाहीत. असे विधी पाहून त्यांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो… गरुड पुराणानुसार स्मशानामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो. जो पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात लवकर प्रवेश करतो.
आजकाल आपण आपल्या धार्मिक परंपरा पासून दूर जात आहोत जे अनुचित आहे. वर्तमानातील अनेक महिला स्मशानात जातात. परंतु त्यांनी असे करू नये. आपल्या ग्रंथांमध्ये जे पण नियम बनवले आहेत त्यामागे काही ना काही मोठे कारण नक्कीच असते.
गरुड पुराणानुसार स्मशानात अनेक अतृप्त आत्म्यांचा वास असतो. ज्यांना मनुष्य शरीरावर कब्जा करायचा असतो त्यासाठी लहान मुले, महिला खास करून कुमारीका सोपा शिकार असतात. हा धोका लक्षात घेऊन देखील महिलांचे स्मशानात जाणे वर्ज्य मानले जाते.
भूत प्रेतावर तुमचा विश्वास असेल तर हे कारण तुम्हाला व्यवस्थित समजेल. आशा आहे या माहितीमुळे तुम्हाला धार्मिक कारणे समजली असतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.