नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो काही महिन्यांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर मध्ये एका लग्नातील नवरीचा डान्स व्हिडीओ तुफान वायरल झाला होता.
20 नोव्हेंबर 2020 या दिवशी संकेत ताजने यांचा विवाह श्वेता हिच्या सोबत झाला होता. याच लग्नात आपल्या होणाऱ्या पती साठी मंडपात प्रवेश करताना श्वेता ने मेरे सैंय्या सुपरस्टार गाण्यावर तुफान डान्स केलेला.
श्वेता चा हा डान्स व्हिडीओ इतका वायरल झाला की श्वेता रातोरात स्टार झाली. तिचे असंख्य चाहते बनले, लोकांमध्ये ती अतिशय लोकप्रिय झाली.
आपल्याकडे मुलींना लग्नात नाचताना पाहिलं की अनेक जणांना ते खटकतं. पण श्वेता ने स्वतःच्या लग्नात नवरी असताना ज्या पद्धतीने तुफान डान्स केलेला त्याचं खुप जणांनी कौतुक केलं.
मेरे सैंय्या सुपरस्टार
श्वेता ने केलेल्या डान्सला काही दिवसांतच लाखो लोकांनी पाहिलं होतं. आपण यापूर्वी नवऱ्याने नवरीमुली साठी केलेले डान्स खूप पाहिले असतील, पण श्वेता ला, एका नवरीला डान्स करताना पहिल्यांदाच पाहत होतो.
मित्रांनो आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे सध्या श्वेता चा नवीन डान्स व्हिडीओ वायरल झालेला आहे.
सध्या इन्स्टाग्राम रिल्स वर पुण्याची मैना या गाण्यावर अनेकजण डान्स करताना दिसून येत आहेत. श्वेता ने या गाण्यावर सुद्धा भन्नाट डान्स केलेला पाहायला मिळत आहे.
पुण्याची मैना
श्वेता ने केलेल्या या डान्स वर आतापर्यंत 50 लाख व्यु आलेले आहेत.
श्वेता ही मूळची जुन्नर इथली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्वेता ने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिचा पती संकेत हा इंजिनिअर असून जॉ ब करतो.
श्वेता सांगते की तिला तिच्या डान्स साठी तिचा नवरा, आणि सासू यांचं खूप सहकार्य मिळतं. श्वेता ला अनेकांनी तिच्या लग्नातल्या डान्स वर वाईट कमेंट करून ट्रोल करण्याचा पण प्रयत्न केला. पण तिला सपोर्ट करणारे भरपूर आहेत.
संकेत आणि श्वेता यांना मराठी धिंगाणा टीम कडून भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा.
मित्रांनो तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा.
अशाच मनोरंजन दुनियेशी संबंधित आणखी पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.