नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आचार्य चाणक्य यांना भारताच्या इतिहासातील महान तसेच खूपच चलाख व्यक्ती म्हणून ओळखले जाते. चाणक्यांनी चाणक्य नीतिमध्ये काही 4 गोष्टी अशा सांगितल्या आहेत. त्या गोष्टीविषयी आपण कोणालाही सांगू नये. कारण या गोष्टी दुसऱ्या लोकांना समजल्यास आपल्याला खूप मोठ्या समस्याचा सामना करावा लागू शकतो.
यातील पहिली गोष्ट म्हणजे, जर आपला कधी अपमान झाला असेल तर ही गोष्ट कोणालाही सांगू नये. कारण लोक समोरच्याचे दुःख हे ऐकून, ते इतरांना हसून सांगत असतात.
आपल्या जीवनात काही घटना अशा घडतात की, त्यात आपण अपमानित होत असतो. जर आपण हा अपमान इतरांना सांगितला, ते आपली चेष्टा करून, आपले हसू बनवतील.
याशिवाय आपल्या जीवनातील मान अपमान याचा लोकांना काहीही फरक पडत नाही. कारण या दुनियेतील जास्तीत जास्त लोक एकमेकांचा हेवा करतात त्यांना आपल्या जीवनात काय घडते, याचा त्यांना काहीच फरक पडत नाही.
मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील काही गुप्त गोष्टी कोणत्याही प्रकारच्या लोकांना सांगू नयेत. कारण याचा लोक गैर फायदा घेऊ शकतात. आपल्या घरातील लहानात लहान गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना आपण जेव्हा सांगतो, त्यावेळी लोक त्याचा गैरफायदा घेऊन हे लोक आपल्या घरात भांडणे व वादविवाद लावण्याचे काम करतात.
मित्रांनो पुढील गोष्ट म्हणजे आपल्या मनातील दुःख इतरांना कधीही सांगू नये. कारण त्यामुळे आपलेच नुकसान होऊ शकते. यामध्ये काही व्यक्तींना सवय असते की, ते लहान लहान समस्या इतरांना सांगतात. त्यामुळे या परिस्थितिचा फायदा ते लोक घेऊ शकतात. त्यामुळे आपले दुख फक्त अशाच व्यक्तींना सांगा की, जे तुमच्या खूप जवळचे किंवा जिवलग आहेत.
या शिवाय जीवनात कधीही आपलं कोणत्याही प्रकारचे झालेले नुकसान कोणालाही सांगू नये. तसेच तुमच्या व्यवसायातील झालेला तोटा कोणालाही सांगत बसू नये. कारण ते लोक या वाईट परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात. कारण आजकाल फक्त पैसा असणाऱ्या लोकांना आपल्या समाजात किंमत दिली जाते. मान दिला जातो.
त्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थिती बद्दल कोणालाही सांगू नका.
याउलट जेव्हाही वाईट किंवा आर्थिक परिस्थिती निर्माण होईल तेव्हा या परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करा. तसेच वाईट काळ आला म्हणजे सर्व काही संपले असे नाही पुन्हा जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत करून आपले साम्राज्य उभे करा. तसेच स्वतःचा सन्मान स्वतः करावा. यासह या चार गोष्टी त्यांना सांगणे टाळावे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले स्टोरी वाले बाबा हे फेसबुक पेज लाइक करा.