नमस्कार मित्रानो
मित्रांनो लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा असतो. महान आचार्य शुक्राचार्य यांच्या अनुसार कोणत्याही पुरुषाचे या तीन कारणांमुळे दोन विवाह होतात. अर्थात असा पुरुष एकापेक्षा जास्त स्त्रियांसोबत लग्न करतो. परंतु तो आपल्या जीवनात कधीच सुखी राहू शकत नाही.
कारण शुक्राचार्य सांगतात, एक मादा पशु सोबत एक नर पशु राहू शकत नाही त्याचप्रमाणे एका पुरुषासोबत दोन स्त्रीयांचे राहणे असंभव आहे. याच कारणामुळे पती-पत्नीच्या दरम्यानचे प्रेम कमी होऊ लागते.
शुक्राचार्य सांगतात कोणत्याही स्त्रीला एका पुरुषाप्रती आणि कोणत्याही पुरुषाला केवळ एका स्त्री प्रती प्रामाणिक राहिले पाहिजे. आपली पत्नी सोडून अन्य स्त्री सोबत संबंध स्थापित करणे याला अशुभ मानले गेले आहे.
सोबतच शुक्राचार्य यांनी चेतावनी देऊन पुरुषांना सांगितले आहे की या चार दुर्गुणांमुळे त्यांची पत्नी त्यांच्या पासून विरक्त होऊन कोणत्या अन्य पुरुषासोबत संबंध स्थापित करण्यासाठी आकर्षित होते.
शुक्रनीति मध्ये खास करून महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. स्त्रियांना सावधान करत शुक्राचार्य यांनी परपुरुष किंवा पती सोडून घरातील अन्य पुरुषांसोबत कसे वागले पाहिजे या बद्दल सांगितले आहे.
शुक्र देव सांगतात की दृष्ट स्त्रियांमध्ये हा गुण असतो, की त्या पर पुरुषांसोबत सुद्धा आपल्या पती प्रमाणेच वागतात. आणि आपल्या दुःखाचा रस्ता स्वतःच तयार करतात.
सगळ्यात आधी जाणून घेऊया अशा पुरुषां बद्दल ज्यांच्या चुकीमुळे त्यांची पतीव्रता स्त्री सुद्धा त्यांना धोका देऊन परपुरुषाकडे जाते आणि त्या नंतर जाणून घेऊयात कोणत्या कारणामुळे पुरुषांचं दोन स्त्रियांसोबत लग्न होते.
शुक्राचार्य यांच्या सांगण्यानुसार जो पुरुष अत्यंत क्रोधी असतो, पत्नीच्या छोट्या-छोट्या चुकांवरही खूप जास्त प्रमाणात राग करतो अशा पुरुषांवर त्यांची पत्नी मनापासून प्रेम करत नाही. अशा स्त्रीला तिच्यावर प्रेम करणारा किंवा तिथे काळजी करणारा कोणी मिळत असेल तर ती आपल्या पतीपेक्षा त्यावर जास्त प्रेम करू लागते.
जो पुरुष नपुंसक प्रमाणे वागतो म्हणजेच आपल्या स्त्रीला शारीरिक सुख देऊन संतुष्ट करण्यात असमर्थ असेल तर त्याची पत्नी त्या पासून विरक्त होऊन परपुरुषासोबत संबंध बनवते. जो पुरुष लहान-सहान गोष्टींवरून आपल्या पत्नीला शिक्षा दंड देतो, मारहाण करतो तर त्या पुरुषाची पत्नी त्याचा त्याग करून निघून जाते.
जो पुरुष पत्नी सोबत प्रेमाने वागत नाही सदैव कठोर शब्दांत तिची निंदाच करत राहतो अशा पुरुषांची पत्नीदेखील त्यांच्यापासून विरक्त होते. जो पुरुष नेहमी पत्नीपासून दुर प्रवासात राहतो आणि आपल्या पत्नीस एकटाच सोडतो तर त्याची पत्नी अवश्य पर पुरुषासोबत संबंध स्थापित करते.
जे पुरुष पत्नी असून देखील दुसऱ्या स्त्रीयांसोबत शारीरिक संबंध बनवतात त्या पुरुषांची पत्नी विरक्त होऊन अन्य पुरुषाकडे झुकते. अशा या सहा कारणांमुळे पुरुषांची पत्नी त्यांना सोडून जाते असे शुक्राचार्य सांगतात.
आता जाणून घेऊया एकापेक्षा जास्त स्त्रियांसोबत लग्न का होते? ज्या पुरुषांच्या कुंडलीत शुक्र पाप ग्रहासोबत असेल तर सांगीतले जाते की त्या जातकाचे दोन विवाह होतात.
जर धनस्थान म्हणजे दुसऱ्या भाव मध्ये अनेक पापग्रह असतील , द्वितीय भावाचा स्वामी देखील पाप ग्रहाने घेरलेला असेल तर अशा व्यक्तीचे तीन विवाह होतात. जर व्यक्तीच्या कुंडलीत सप्तम किंवा अष्टम स्थानी पाप ग्रह शनी राहू केतू सूर्य असेल आणि मंगळ बाराव्या स्थानी असेल तर अशा व्यक्तीचे दोन विवाह होतात.
जर कोणा व्यक्तीच्या कुंडलीत सप्तम स्थानात स्वामी सोबत मंगळ राहू केतू शनी सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असतील तर एक स्त्री च्या मृत्युपश्चात व्यक्ती दुसरे लग्न करतो. तर मित्रांनो अशाप्रकारे कुंडलीतील दोषांमुळे व्यक्तीचे एकापेक्षा अधिक विवाह होतात.
तर त्याच्या दोन्ही पत्नीचा स्वभाव चांगला असेल तर त्यांचे जीवन सुखमय होते. जर दोन्ही स्त्री अंतर्गत मतभेद वाल्या असतील तर व्यक्तीला अनेक दुःखांचा सामना करावा लागतो. आशा आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल. || जय शुक्रदेव ||
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.