भगवान श्रीकृष्ण सांगतात देवघरात असेल ही एक वस्तु… तर तिथे कधीच येत नाही गरिबी…

0
475

नमस्कार मित्रांनो,

जीवनाचा खरा अर्थ सांगणारे भगवान श्रीकृष्ण यांनी मनुष्याला उपदेश करताना काही गूढ गोष्टी सांगितल्या आहेत.

मंगल कलश किंवा मंगल कुंभ भारतीय ज्योतिष प्रयोगांमध्ये कलशाला स्वत: चे महत्त्व आहे. त्याच्या मुखावरती भगवान विष्णू, गळ्यात भगवान शिव आणि मूळात भगवान ब्रह्मा यांचे वास्तव्य आहे.

कलशातील मांगलिक शक्ती जी पूजेचे पूर्ण फळ देते. ज्योतिष शास्त्रात असे वर्णन आहे की मंगल कलश सर्व देवी-देवतांनी वसविला आहे.

घरातील पूजेत ठेवलेले कलश समृद्धीचे प्रतीक आहे. सर्व देवी-देवता त्याच्या स्थापनेमुळे खूष आहेत. आपण इतकी देवपूजा करतो, देवांची सेवा करतो मग देवाने आपलं अस का केलं अस वाटतं.

काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. यामुळे घरातील आर्थिक व बाकीच्या समस्या वाढतात. यामुळे तुम्ही हा उपाय जो साक्षात भगवान श्रीकृष्णाने सांगितलाय तो करा.

मित्रांनो देवघरातील देव हे आपले कुलदेवी, कुलदेवता असतात. गणपती, बाळकृष्ण व अन्नपूर्णा असते. या देवी देवतांबरोबर अजून एक पवित्र गोष्ट हवीय ती म्हणजे मंगल कलश होय.

हा मंगल कलश आपल्या जीवनात खूप आनंद आणतो, हा मंगल कलश आपल्या कुलदैवत असणाऱ्या देवाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुमच्या देवघरात असा तांब्याचा कलश असायलाच हवा.

शुभ दिवस पाहून देवघरात ईशान्य कोपऱ्यात, देवांच्या उजव्या बाजूला याची स्थापना करायची आहे. स्थापन करण्यापूर्वी एक चांगला नारळ घ्या, थोडे तांदूळ व सुपारी त्यात टाका.

कलशात पवित्र जल भरून त्यावर हा नारळ ठेवा व तुमच्या कुलदेवतेचा नाव घ्या, नामस्म रण करा. यानंतर रोज पूजा करताना या मंगल कलशातील पंक घरात सर्वत्र शिंपडा. ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल.

हा मंगल कलश घरात देवघरात असायलाच हवा. यामुळे घरावरील संकटे, अडचणी दुर होतात. तसेच आपल्या कुलदेवतेची पूजा रोज घडल्याने पुण्य मिळते व आशीर्वाद प्राप्त होतो.

आपल्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी कुलदेवतेची पूजा केली जाते, जशी तुम्ही अशी करू शकता. देवघरातील ही एक वस्तू म्हणजे कलश होय. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा लहरी फिरत असतात.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here