महाशिवरात्रीच्या दिवशी गाईला खाऊ घाला हि एक वस्तू… लक्ष्मी धावत येईल घरी…

0
156

नमस्कार मित्रानो,

महाशिवरात्रीचे पर्व शिवभक्तांसाठी खूप महत्वाचं मानलं जात. पुराणातील मान्यतेनुसार याच दिवशी श्रुष्टिची निर्मिती झाली होती. सोबतच शास्त्रात असे सुद्धा लिहिले आहे कि या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला होता.

याच कारणामुळे महाशिवरात्रीला खूप महत्व दिले जाते. या वर्षी महाशिवरात्री १८ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करावे.

या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात. सोबतच तुम्ही जर धोतऱ्याचं फळ शिवलिंगावर अर्पण करत असाल तर पैशा संबंधी समस्या दूर होऊ शकतात.

जर तुमच्या घरात कोणी आजाराने त्रस्त असेल, सारखेच घरात आजारपण येत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगासमोर देशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा. आणि सोबतच ओम नमः शिवाय हा मंत्र जप करावा. लवकरच आजारपण नाहीसे होऊन सुदृढ आयुष्य जगायला सुरवात कराल.

लक्षात ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर केवळ कच्च दूध अर्पण करावं. शिवलिंगावर चुकून सुद्धा उष्टे किंवा उकळलेलं दूध अर्पण करू नये. कच्च्या दुधाचे अर्पण केल्याने जीवनातील समस्यांचे लवकरच निवारण होईल.

मित्रांनो खऱ्या मनाने, निसंकोचीत प्रेम भावनेने जर एक थेंब जरी शिवलिंगावर अर्पण केला तरी तो फलदायी ठरतो.

महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या दरवाजावर कोणी साधू किंवा गरजू आला असेल तर त्यांना खाली हात कधीच पुढे पाठवू नका. त्यांना अन्नदान अवश्य करा. महाशिवरात्रीला दान केल्याने पुण्य मिळते.

या दिवशी जर कोणी भुकेल्या प्राण्याला अन्न खाऊ घातले तर त्या व्यक्तीवर शिवजींची कृपा दृष्टी कायम राहते. सोबतच त्या व्यक्तीची रखडलेली कामे संपन्न होऊन जातात.

महाशिवरात्रीच्या दिवशी गाईच्या सेवेचे खूप जास्त महत्व आहे. शिवजींना गौ मातेचे दूध अत्यंत प्रिय आहे. म्हणून या दिवशी गौ मातेच्या सेवेचे महत्व आहे. या दिवशी नंदीला आणि गाईला केळी अवश्य खाऊ घातली पाहिजेत.

असे केल्याने तुमच्यावर आई कामधेनूची कृपा बरसते. धन प्राप्तीच्या मार्गात आलेली सर्व संकटे दूर होतील. तर मित्रांनो हे होते काही उपाय जे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य करायला हवेत.

हा लेख वाचणाऱ्या सर्व व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच महादेवा चरणी प्रार्थना. हर हर महादेव.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here