नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो यावर्षी महाशिवरात्री 11 मार्च 2021 रोजी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे. महाशिवरात्री हि तंत्र मंत्र करण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रभावशाली रात्र मानली जाते. अनेक लोक या रात्री उपाय आणि तोडगे करताना दिसतात.
या रात्री केलेले उपाय अतिशय प्रभावशाली आणि जलद गतीने फळ देणारे ठरतात. मित्रांनो आज आपण महाशिवरात्रीच्या रात्री करावयाचा अत्यंत महत्वाचा तोडगा पाहणार आहोत. या उपायाने आपल्या घरातून गरिबी, अलक्ष्मी, दारिद्र्यता, कंगाली यांना हद्दपार करतो.
मोठ्या प्रमाणात धन, वैभव, ऐश्वर्य आपल्या वास्तू मध्ये आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ लागत. लक्ष्मीचा निरंतर वास आणि लक्ष्मीची निरंतर वृद्धी हि आपल्या वास्तूत सदैव घडून येऊ लागते.
मित्रांनो हा उपाय आपण महाशिवरात्रीच्या रात्री बरोबर 12 वाजता करायचा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे आणि सोबतच धोतऱ्याचं एक फळ लागणार आहे.
लाल कपड्याचा आकार धोतऱ्याचं फळ बांधता येईल इतका असावा. मित्रांनो शिवरात्रीच्या दिवशी आपण जवळपासच्या शिवालयात जायचं आहे म्हणजे शिवमंदिरात जायचं आहे. आणि मनोभावे लाल कपड्यात बांधलेले धोतऱ्याचं फळ शिवलिंगावर अर्पण करायचं आहे.
मित्रांनो हे फळ ठेवल्यानंतर आपण मंदिरातील गाभार्याच्या बाहेर यायचं आहे आणि बाहेर येऊन बसायचं आहे. आणि एका मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. आणि तो मंत्र आहे श्री शिवाय नमस्तुभ्यं. साधारण अर्धा तास या मंत्राचा जप करायचा आहे.
आपली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे. आपलं दुकान चालत नसेल, व्यवसाय होत नसेल, व्यापारात तोटा होत असेल, शेती मधून उत्पन्न निघत असेल. अगदी तुमची जी समस्या आहे ती बोलून दाखवायची आहे.
या सर्व समस्येमधून बाहेर पडायची प्रार्थना आपण शिवशंभो समोर बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या घरी परत यायचं आहे. मित्रांनो एका महिन्यातच आपल्या घरी लक्ष्मी येऊ लागेल. लक्ष्मीचा निरंतर वास राहील.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.