सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारी बिग बॉस मधील कीर्तनकार शिवलीला ताई पाटील या सध्या खूप चर्चेत आहे . शिवलीला पाटील हिचा बिग बॉस सोडण्याचा व्हिडियो आपण सर्वानीच पाहिला आणि त्या व्हिडियो मध्ये तिने आपण बिग बॉस का सोडले ते सांगितले.
शिवलीला ताईंनी बिग बॉस सोडण्याचे कारण असे सांगितले कि माझी प्रकृती खालावली होती आणि माझे शरीर मला साथ देत नव्हते म्हणून मी हा खेळ सोडला असे तिने सांगितले होते .
तिच्या ह्या निर्णयाने तिच्या चाहत्यां मध्ये आणि बिग बॉस मधील सदस्यांमध्ये खूप नाराजी व्यक्त झाली. पण शिवलीला ताईंना बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर खूप गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.
शिवलेला ताईंनी संपूर्ण वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. ही माफी तिने एक कीर्तनकार असून बिग बॉस मध्ये प्रवेश करण्यासाठी मागितली आहे. असे त्यांनी ऐका मुलाखातीत सांगितले आहे.
तिने हे ही सांगितले आहे की माझे पुढचे निर्णय मी सगळ्यांना विचारूनच घेणार आणि अशी कोणतीही गोष्ट करणार नाही जी तुम्हाला चुकीची वाटेल. पुढे शिवलीला ताई म्हणतात कि मी बिग बॉस मधील सदस्यांना कीर्तन काय आहे हे सांगायचे आणि बाकी सदस्य सुद्धा माझ्या बरोबर तुळशीची प्रार्थना करायचे.
मी सर्वांची हाथ जोडून माफी मागते असे शिवलीला ताईंनी सांगितले आणि पुढे असं चुकीचं काहीच घडणार नाही असे सांगितले आहे.
बघा व्हिडियो