हि लक्षणे दिसली तर समजून जा शनिदेव आहेत तुमच्यावर प्रसन्न…

0
482

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हिंदू धर्मात शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित केला जातो. नवग्रहात शनीच आहे जो सर्वात क्रूर मानला जातो. शनीची साडेसाती आली कि कितीही मोठा व्यक्ती असो त्याला त्रास होतोच.

हि गोष्ट खूप कमी लोकांनाच माहित असेल कि शनी ग्रह इमानदार व्यक्तींसाठी यश, धन, पद, सन्मानाचा ग्रह मानला जातो. शनी संतुलन आणि न्यायाची देवता आहे. शनीच धनसंपत्ती आणि मोक्ष देतात.

असं म्हटलं जात कि शनी पापी व्यक्तींसाठी अत्यंत दुःखदायक आहे. शनीची साडेसाती लागली कि जीवनात बरेच चढ उतार येतात अशी साडेसाती ज्यामुळे पूर्ण आयुष्याची वाट लागू शकते. करोडपती माणूस सुद्धा या काळात रोडपती बनू शकतो.

परंतु मित्रांनो शनिदेव बऱ्याच लोकांसाठी शुभ आणि श्रेष्ठ सुद्धा आहे. सूर्यपुत्र शनिदेव असे आहेत जे मनुष्याच्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्याला फळ देत असतात.

मित्रांनो ग्रंथामध्ये असेल म्हटलं आहे कि ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा बरसते त्यांच्या विषयी काही लक्षणे सांगितली गेली आहेत. आज आम्ही तुम्हाला याच लक्षणांबद्दल सांगणार आहोत.

मित्रांनो शनिदेवाची कृपा ज्या व्यक्तींवर असते त्या व्यक्तींना खूप कमी वयापासूनच हाडांचा ठिसूळपणा, हाडे दुखणे अशा हाडांच्या समस्याच जाणवतात. त्यामुळे व्यक्तीला चालण्या फिरण्यात सुद्धा समस्या निर्माण होतात.

पाय मुरगळणे, हात फॅक्चर होणे, कंबर दुखी अशा छोट्या छोट्या व्याधींनी या व्यक्ती नेहमी त्रस्त असतात. या व्यक्तींचे दुखणे जितके मोठे असते तितके ते दिसून येत नाही. म्हणजे यांच्यासोबत एखादी मोठी घटना घडली तरी त्यापासून यांना जास्त नुकसान होत नाही.

यांना शरीरांतर्गत अशा काही जखमा होतात ज्या त्यांना आयुष्यभर पुरतात. असे व्यक्ती कोणाचीही मदत न घेता एकटेच आपल्या जीवनात पुढे जातात. यांना कोणाची मदत घेणे कधी आवडत नाही.

असे व्यक्ती शून्यापासून सुरवात करतात व उच्च पदावर पोहोचतात. आपल्याला हे वर वर अगदी सामान्य वाटतात परंतु हे मनातून एकटे असतात. शनिदेवाची कृपा दृष्टी असलेल्या व्यक्तींना लबाडी, खोटे बोलणे, कपट करणाऱ्या व्यक्ती अजिबात आवडत नाहीत.

या कारणामुळे त्यांचे मित्र मैत्रिणीसुद्धा कमीच असतात. असे व्यक्ती स्वतःच्या जीवनातच धन्यता मानणारे असतात. म्हणून यांना एकटेच राहणे आवडते. असे व्यक्ती नेहमी सत्याच्या मार्गावर चालतात व मित्र मैत्रिणींना सुद्धा सत्याच्या मार्गावर चालायला प्रेरित करतात.

असे व्यक्ती समाजसेवक, समाजसुधारक किंवा संन्यासी वृत्तीचे असतात. शनिदेवाची कृपा असणाऱ्या व्यक्तींना वयाच्या पस्तीशी नंतर खूप मोठे यश मिळण्याची दाट शक्यता असते.

कुंडलीत जर शनिदेव शुभ स्थानी असतील व त्यांची जातकावर कृपा असेल तर वयाच्या पस्तीशी नंतर अशा व्यक्तींना धन संपत्ती भरपूर मिळते. अशा जातकांचा कोणी इतर गुरु नसतो. असे व्यक्ती एक तर अबोल असतात किंवा बोललेच तर कटू सत्य बोलतात.

बोलल्यानंतर कोणाला चांगले वाटेल कोणाला वाईट वाटेल याच्याशी त्यांना काही देणेघेणे नसते. शनिदेव त्यांची कृपा असलेल्या व्यक्तींच्या चुकांवर पांघरून घालत नाहीत तर त्या चुका मोकळ्या करतात .

शनी देवांना दुतोंडी व्यक्ती अजिबात आवडत नाहीत. ज्या व्यक्ती गरीब, लाचार, स्त्रिया, लहान मुलें, वयोवृद्ध यांच्यावर अन्याय करतात अशा व्यक्तींवर शनिदेवाची कुदृष्टी असते. अशा व्यक्तींवर शनी देवाचा कोप होतो.

शनिदेव सत्याच्या बाजूने उभे राहतात तर असत्याची सर्व शक्ती काढून घेतात. नेहमी सत्याच्या मार्गावर चालणारे व धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा राहते.

मित्रांनो हि लक्षणे जर तुमच्यात असतील तर समजून जा तुमच्यावर शनिदेवाची कृपा दृष्टी आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here