नमस्कार मित्रांनो
मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये शनि ग्रहाच्या राशी बदलाचे विशेष महत्त्व आहे. १७ जानेवारी २०२३ रोजी शनि गोचर झाले आहे. शनीने त्याच्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश केला आहे. जेव्हा शनि कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा अनेक राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता असते.
शनि संक्रमणाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी शनि गोचर फायदेशीर ठरणार आहे.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी संक्रमण खूप फायदेशीर मानले जात आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी शनि संक्रमण चांगले दिवस घेऊन येणार आहे.
मिथुन राशीवर शनि ढैय्याचा प्रभाव होता, मात्र शनि राशी बदलल्याने शनि ढैय्या दूर झाली आहे. येत्या अडीच वर्षांत तुम्हाला मान-सन्मान मिळेल. करिअरच्या दृष्टीने वेळ खूप फायदेशीर असणार आहे.
तूळ रास
शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच तूळ राशीच्या लोकांसाठी शनी ढैय्या संपली आहे. अशा स्थितीत तूळ राशीच्या लोकांसाठी शनि संक्रमण लाभदायक मानले जात आहे.
तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळणार आहे. येत्या अडीच वर्षात नोकरीच्या ठिकाणी काही मोठी जबाबदारी मिळू शकते. अपत्यप्राप्तीची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे.
मकर रास
मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. मकर राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण जोरदार लाभदायक ठरू शकते. या काळात तुम्हाला कोणत्याही जुनाट आजारापासून आराम मिळेल. नोकरीत बढतीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीचा लाभ मिळेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लिक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.