नमस्कार मित्रांनो
मित्रानो शनि ग्रहाच्या स्थितीत बदल होणार आहे. शनि ग्रहाच्या स्थितीतील बदल काही राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेयून येणार आहे. ग्रहांचे देवता शनिदेव 23 ऑक्टोबर रोजी प्रतिगामी गतीने मार्गस्थ होणार आहे.
योगायोगाने हा दिवस धनत्रयोदशीचाही आहे. ज्योतिषांच्या मते 22 आणि 23 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी त्रयोदशी तिथी येत आहे. अशा परिस्थितीत हा उत्सव दोन दिवस साजरा केला जाऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात शनीच्या मार्गाने अनेक राशींना लाभ होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशींबद्दल.
मेष रास
धनत्रयोदशीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना शनि मार्गात असल्यामुळे लाभ होईल. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. शनिदेव आणि धनकुबेर यांची कृपा तुमच्यावर राहील. नोकरीत बढतीचे योग आहेत. व्यापाराचा विस्तार या काळात घडून येऊ शकतो.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांना शनि मार्गात असल्यामुळे पूर्ण लाभ मिळेल. या दिवशी तुमच्यासाठी धन योग बनतील. तुमचा खर्च वाढू शकतो, पण तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.
तूळ रास
शनीचा मार्ग तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या दिवशी सोने खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. प्रवासाचे योग आहेत.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनि मार्गस्थ होऊन जीवनात आनंद आणेल. या काळात तुम्हाला वाहन आणि घराचे सुख मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासाचे योग आहेत. उत्पन्नात वाढ शक्य आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. सरकारी कामे मार्गी लागतील.
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी शनि मार्ग खूप फायदेशीर असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळेल. मानसिक तणाव दूर होईल. मीन राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.