नमस्कार मित्रानो,
मित्रांनो साडेसाती हि आपल्या मागील चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते. जेणेकरून आपण त्याच चुका किंवा त्याच प्रकारच्या अनेक चुका पुन्हा पुन्हा करू नयेत. सोबतच आपल्या जीवनाला एक चांगली दिशाही देते.
मित्रानो नेहमी लक्षात ठेवत जा कि आपल्या छोट्या छोट्या गोष्टींवर शनी महाराजांचे लक्ष असते. असे म्हणतात कि शनी कुछ भुलते भी नही है और नाही क्षमा करते है. मित्रानो शनिमहाराजांना कर्मफलाचे दाता मानले जाते.
ज्या व्यक्तींना शनी साडेसातीचा त्रास आहे त्यांनी हनुमान चालीसा वाचन आणि शनी माहात्म्य रोज वाचावे. शनिवारी मारुतीरायांना आणि शनिदेवाला तेल चढवावे. सोबतच रुईचेपान व फूलही वाहावे.
शनी लग्नस्थानी आहे किंवा कडक आणि गंभीर योग आहे तर अमावस्येला सुरवात करावी चढते आणि उतरते दिवे लावण्याची. अमावस्येच्या संध्याकाळी कनिकाचा एक दिवा लावून सुरवात करावी आणि रोज एक एक वाढवत जाऊन पौर्णिमे पर्यंत 15 दिवे करावेत.
आणि पौर्णिमेपासून उतरत्या क्रमाने म्हणजेच 14, 13, 12 असे करता करता अमावस्येपर्यंत पुन्हा एक दिव्या पर्यंत यावे. असे सलग तीन महिने करावे. आणि शनी माहात्म्य वाचावे. हनुमान चालीसा वाचन करीत राहावे. एकदा तरी शनी शिंगणापूरला जाऊन शनीचे दर्शन घेऊन यावे.
तेथे एक तास पटांगणात बसून शनी महाराजांचा जप करावा. चिडचिड होणे, बॉसचे आपल्यावर चिडणे, दुकानात गिर्हाईक न येणे, दुकानात कामगार न टिकणे, सतत अपघात, घरात भांडण तंटे होणे इत्यादी त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या गोष्टी अवश्य कराव्यात.यामुळे नक्कीच फायदा होतो.
रोज अशाच सुंदर पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.