नमस्कार मित्रानो
मित्रानो ग्रहांच्या बदलामुळे काही राशींच्या जातकांचा वाईट काळ सुरु होता. परंतु ग्रहांच्या हालचालीतील बदलामुळे शनीची साडेसाती काही राशींसाठी समाप्त झालेली आहे. ग्रहांची होणारी हि राशांतरे काही खास राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मित्रानो ज्या राशींची शनीची साडेसाती संपली आहे, त्या राशींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
सिंह रास
शनीच्या साडेसातीपासून मुक्त होणारी पहिली रास म्हणजे सिंह रास. आजपासून सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. इथून पुढे जे काम हाती घ्याल त्यात यांना यश मिळणार आहे.
ज्या व्यक्ती करियरच्या बाबतीत बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेत त्यांचे करियर इथून पुढे चांगले घडू शकते. सिंह राशीच्या लोकांना जीवनात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांनी नित्य नियमाने महादेवाची पूजा करावी. महादेव अपेक्षित फळे नक्कीच देतील.
कन्या रास
ज्योतिष शास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांच्या कुंडलीतून शनी महाराज निघून गेले आहेत. ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद येऊ शकतो आणि त्यांना प्रेम जीवनात यश मिळू शकते.
यासोबतच करिअरसाठी येणारा काळ त्यांच्यासाठी अत्यंत शुभ असेल. त्यांना त्यांच्या कारकीर्दीत अपेक्षित नोकरी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांनी शनिदेवाची पूजा करावी जेणेकरून शनीची साडेसाती त्यांच्या आयुष्यात पुन्हा येऊ नये.
मीन रास
ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनीच्या साडेसाती बराच काळ चालू होता. परंतु ग्रहांच्या हालचालीतील बदलामुळे त्यांच्या कुंडलीतून शनीची साडेसाती संपलेली आहे.
त्यामुळे इथून पुढे मीन राशीच्या लोकांचे आयुष्य आनंदीमय असणार आहे. इथून मागे तुमच्या आयुष्यात साडेसाती मुळे लग्नात अडचणी येत असतील , मात्र आता लग्नाचे योग जुळून येत आहेत. तसेच, येत्या काळात, मीन राशीचे लोक त्यांच्या प्रत्येक गोष्टीत यश मिळवतील. हा काळ त्यांच्या आयुष्यासाठी चांगला काळ आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.