नमस्कार मित्रानो
सप्टेंबर महिन्यात शनी मकर राशीत गोचर करणार आहेत. शनीची वक्री नजर ज्या राशींवर पडते त्यांच्यावर अनेक संकटे येऊ शकतात. पण सोबतच या राशींवर शनीचा सकारात्मक परिणाम दिसू येऊ शकतो. ज्यामुळे त्यांना व्यापार, वाणिज्य, उद्योग इत्यादी क्षेत्रात लाभ मिळू शकतो. आणि जर ते कोणत्याही क्षेत्रात नोकरी करत असतील तर त्यात पगार वाढ किंवा पदोन्नतीच्या संधी मिळण्याचे संकेत आहेत.
यासोबतच कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. अशातच कर्जाचे व्यवहार टाळा.कोणत्याही नवीन कामाची सुरवात करत असाल तर विचारपूर्वक करा आणि सावधगिरी बाळगा. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी ज्यांच्यावर शनीची नजर पडणार आहे.
मिथुन रास
मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही राशीतून शनी चतुर्थ आणि आठव्या घरात असतो तेव्हा या स्थानास शनीची ढैय्या असे म्हणतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी ढैय्याचा प्रभाव चालू आहे. परंतु शनी ढैय्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात तसेच निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते.
परंतु तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घ्यावी लागेल. या महिन्यात विनाकारण वादात पडू नका.या महिन्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि व्यवसायात देखील प्रगतीचे योग जुळून येत आहेत. नोकरदारांना कामात पदोन्नती मिळू शकते.
तूळ रास
तूळ राशीवर शनि ढैय्याचा प्रभाव आहे. या महिन्यात तूळ राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल आणि पैशाचे अनेक मार्ग उघडतील. परंतु अनावश्यक वादविवाद टाळा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते तसेच सप्टेंबर महिन्यात तुमच्यासाठी खर्चाचा जाईल. पैशाचा सुज्ञपणे वापर करा. आणि महिन्याच्या शेवटी उत्पन्नात घट होऊ शकते. सोबतच व्यापारात नफा मिळण्याची चिन्हे आहेत.
धनु रास
सप्टेंबर महिन्यात शनीच्या साडेसातीचा प्रभाव धनु राशीच्या लोकांवर राहील. ज्यामुळे सप्टेंबर महिना त्यांच्यासाठी शुभ ठरेल. कारण शनी त्यांच्या पैशाच्या घरात बसला आहे. ज्यामुळे तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी लाभदायक आणि व्यवसाय फायदेशीर ठरेल.
मकर रास
सप्टेंबर महिन्यात मकर राशीच्या लोकांवर शनि साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. सप्टेंबर महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहावे लागेल कारण काही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आरोग्याबद्दल तुम्ही चिंता कराल. या महिन्यात दुखापत होण्याची शक्यता देखील आहे. जर तुम्ही समुद्री व्यवसायात पैसे गुंतवणार असाल तर असे करू नका कारण तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांवर शनि साडेसातीचा प्रभाव आहे. सप्टेंबर महिन्यात, कुटुंबात किरकोळ वाद , मतभेद होऊ शकतात. कारण शनीची दृष्टी दुसऱ्या घरावर आहे. ज्यामुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात. पैशांचा सुज्ञपणे वापर करा कारण अचानक तुमच्यावर खर्च वाढू शकतो. आणि जर तुम्ही एखाद्याला कर्ज देत असाल किंवा कोणाकडून कर्ज घेत असाल तर तेही टाळा कारण यामुळे वाद होऊ शकतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.