नमस्कार मित्रांनो,
उद्या माघ कृष्ण पक्ष पूर्व भाद्रपदा नक्षत्र दिनांक 13 मार्च रोज शनिवार असून शनी अमावस्या आहे. हा दिवस भगवान शनिदेवाला समर्पित आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हणून ओळखले जाते.
मित्रांनो हिंदू धर्मानुसार प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेचे स्वतःचे एक वेगळे महत्व आहे. उद्या येणारी शनी अमावस्या हि अतिशय शुभ फलदायी मानली जात असून भगवान शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उपयुक्त मानला जातो.
भगवान शनिदेव न्यायाचे देवता असून कर्म फलाचे दाता आहेत. शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही.
शनी अमावस्येच्या दिवशी पितरांच्या पूजेसोबतच शनी देवाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. भगवान हनुमानजींचा सुद्धा शनिवार हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी बजरंबलीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे, बाधा आणि परेशानी दूर होते.
हनुमान हे संकट मोचन आहेत. ज्यांच्यावर बजरंगबलीची कृपा बरसते त्यांना आपोआपच शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. शनी अमावस्येच्या दिवशी शनी चालीसाचा पाठ करून एखाद्या गरजू व्यक्तीला दान धर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात.
या दिवशी शनिदेवाला काळे तीळ, काळे उडीद आणि तेल अर्पण करणे अतिशय शुभ मानण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो उपाय केल्याने शनिदेव अतिशिग्र प्रसन्न होतात आणि मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात.
मान्यता आहे कि या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे सर्वात उत्तम मानण्यात आले आहे. हा उपाय अतिशय फलदायी सिद्ध होणार आहे. मान्यता आहे कि पिंपळाच्या वृक्षामध्ये ब्रह्म, विष्णू, महेश या त्रिदेवांचा वास असतो.
या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव अतिशय त्वरित प्रसन्न होतात आणि मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
या दिवशी असे केल्याने शनीची साडेसाठी दूर होऊन सुख समृद्धीची प्राप्ती होते. शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो त्यामुळे जीवनातील नकारात्मक परिस्थिती बदलून सकारात्मक काळाची सुरवात होते. धनसंपत्ती आणि वैभवात वाढ होते
मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्मफळाचे दाता असल्याने या काळात आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. वाईट कामांपासून दूर राहणे गरजेचे असून व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.