नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो भगवान शनिदेव हे ग्रहांचे न्यायाधीश असून ते अतिशय न्यायप्रिय मानले जातात. शनी हे न्यायाचे देवता असून कर्मफलाचे देवता आहेत. मित्रांनो शनीच्या दृष्टीपासून कोणीही वाचू शकत नाही.
जेव्हा ज्या राशीसाठी शनी देव अशुभ असतात अशा व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मानसिक ताणतणाव, नोकरीत अधिकारी वर्गाशी मतभेद, व्यापारात नुकसान होणे, पैशांची तंगी, कामात वारंवार अपयश येणे, वैवाहिक जीवनात कलह अशा अनेक समस्यांचा सामना त्या व्यक्तीला करावा लागतो.
मित्रांनो शनी हे नेहमी अशुभ फल देतात असे नाही. शनीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत. मित्रांनो भगवान शनिदेव हे फक्त कर्मफलाचे दाता आहेत म्हणून ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांना शनीच्या क्रोधाला घाबरण्याचे काही कारण नाही.
शनी हे भाग्याचे कारक असून धनसंपत्तीचे कारक देखील आहेत. जेव्हा शनी शुभ फल देतात तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. सूर्यपुत्र शनिदेव जेव्हा शुभ फल प्रदान करतात तेव्हा व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून जाते.
दुःखाचा अंधकार दूर होऊन सुखाचे सुंदर दिवस यायला सुरवात होते. प्रत्येक शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात.
जे लोक विधिविधान पूर्वक भक्तिभावाने शनीची पूजा करतात आणि शनीच्या नावे दानधर्म करतात अशा लोकांवर शनिदेव न नेहमी प्रसन्न असतात.
प्रत्येक मंगळवारी हनुमानजींची पूजा करून हनुमान चालीसेचा पाठ केल्याने शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो. सध्या मिथुन, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशीवर शनीची अशुभ दृष्टी असून यांना सावध राहणे गरजेचे आहे.
ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीची महादशा चालू आहे अशा लोकांना देखील सावध राहणे गरजेचे असून या कामांपासून दूर राहणे गरजेचे आहे. मित्रांनो भगवान शनीला प्रसन्न करण्यासाठी वाईट कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीचे किंवा दुर्बळ व्यक्तीचे शोषण कधी करू नका.
कष्ट करणाऱ्या गरीबाचा कधी अपमान करू नका. वाईट सवयी आणि चुकीच्या कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शब्दाने कोणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मित्रांनो प्रत्येक शनिवारी शनी देवाला काळे तीळ, काळे उडीद, काळे कापड, काळी छत्री आणि मोहरीचे तेल अर्पण करणे अत्यंत शुभ मानण्यात आले आहे.
सोबतच गरजूंना दान केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात.आपल्या जीवनातील शनीचा वाईट प्रभाव दूर होतो.
मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.