सप्टेंबर २०२१ राशीफळ. मेष , मिथुन आणि कन्या राशी पाचही बोटे तुपात असतील. जाणून संपूर्ण राशींबद्दल.

0
272

नमस्कार मित्रानो

सप्टेंबरमध्ये अनेक ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत. 6 सप्टेंबरला शुक्र आणि मंगळ राशी बदलतील. गुरु 14 सप्टेंबरला आणि सूर्य 17 सप्टेंबरला . 22 सप्टेंबर रोजी बुध सुद्धा आपली राशी बदलेल. ग्रहांच्या बदलत्या हालचालीचा अनेक राशींवर शुभ परिणाम होईल, तर अनेक राशीच्या लोकांना समस्येचा सामना करावा लागणार आहे.

मेष रास

सप्टेंबर महिना तुमच्यासाठी खूप शुभ सिद्ध होईल. करिअरमध्ये प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. लव्ह लाईफसाठी हा महिना संमिश्र असेल. प्रकृतीची मात्र काळजी घ्यावी लागेल.

वृषभ रास

हा महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा ठरेल. मात्र करिअरच्या दृष्टीने वेळ खूप चांगला जाईल. शिक्षण क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कौटुंबिक जीवनात वाद उद्भवू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा. प्रेम आणि आरोग्याच्या बाबतीत हा महिना संमिश्र असेल.

मिथुन रास

या महिन्यात तुम्हाला तुमच्या कारकीर्दीत शुभ परिणाम मिळतील आणि यश मिळण्याची दाट शक्यता आहे. पण लव्ह लाईफसाठी हा महिना तितका चांगला नसेल. तुम्ही कोणत्याही आजाराला बळी पडू शकता. धन लाभ होण्याचे संकेत आहेत. व्यापारात आधी पेक्षा जास्त नफा होईल. घर परिवारात आनंदाचे वातारण राहील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना या महिन्यात कोणत्याही कामात धीर धरावा लागेल. लव्ह लाईफ आणि हेल्थ लाइफ मध्ये त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. करिअरसाठीही हा महिना फारसा चांगला नसेल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना फारसा लाभदायक नसेल. करिअरमध्ये छोटे यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात उलथापालथ होईल. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

कन्या रास

तुमच्या करिअरच्या दृष्टीने सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. प्रेमविवाह जुळून येण्याचे योग बनत आहेत. एखाद्या व्यक्तीला जुन्या आजारांपासून मुक्तता मिळू शकते.

तुळ रास

हा महिना तुमच्या करिअरसाठी खूप चांगला आहे. शिक्षण क्षेत्रात संमिश्र परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वेळ पडली तर डॉक्टर कडून घ्यावा लागू शकतो.

वृश्चिक रास

सप्टेंबर महिना तुमच्या कारकिर्दीसाठी खूप चांगला सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे योग्य परिणाम मिळतील. व्यावसायिकांनाही यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन चांगले राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आव्हाने पार पडण्याची वेळ येऊ शकते.

धनू रास

या महिन्यात तुमची मेहनत फळाला येईल. करिअरमध्ये प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती होऊ शकते. कौटुंबिक जीवन आश्चर्यकारक राहील. आपल्या मित्रांसोबत कोणत्याही प्रकारचे वाद टाळा. आरोग्याच्या दृष्टीने वेळ अनुकूल राहील.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना जेमतेम राहील. करिअरमध्ये चढ -उतार येऊ शकतात. प्रेम जीवन चांगले असेल. अचानक तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा करिअरसाठी वेळ चांगला आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला आदर मिळेल. कोणत्याही कामात मोठे यश मिळू शकते. शिक्षणासाठी वेळ शुभ आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मीन रास

सप्टेंबर महिना तुमच्यासाठी संमिश्र ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. शिक्षण क्षेत्रात संमिश्र परिणाम दिसून येतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here