संस्कारी सून अशी ओळख असणारी सायली संजीव दिसणार बोल्ड सीन मध्ये… बोल्ड सीन ने लावली आग…

0
655

नमस्कार मित्रानो,

आजकाल मराठी चित्रपटाने आपला पारंपारिक साज बाजूला टाकून नवीन बोल्ड आणि ब्युटीफुल अवतार धारण केला आहे. गेले काही वर्ष मराठी मध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट बनत आहेत. श्वास या चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने मराठी सिनेमाने कात टाकली असं म्हणावं लागेल.

श्वास हा चित्रपट तर ऑस्कर च्या पायरी पर्यंत गेला होता. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ सुरु झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पूर्वी अनेक चित्रपट हे निव्वळ सरकारी अनुदान लाटण्यासाठी बनवले जायचे असं म्हटलं तरी चालेल. कारण त्या चित्रपटांचा दर्जा तसा सुमारच असायचा. अपवाद सचिन, लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ तसेच महेश कोठारे निर्मित चित्रपटांचा.

लक्ष्या आणि अशोक सराफ यांनी तर अनेक चित्रपटात अजरामर भूमिका केल्या. त्यांचे चित्रपट आजही तेवढ्याच चवीने पाहिले जातात. त्यांचा अशी हि बनवाबनवी हा उत्तम उदाहरण आहे. आजही हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टी मध्ये मैलाचा दगड मानला जातो.

पूर्वी अभिनेते चित्रपटासोबतच नाटकांमध्ये सुद्धा काम करायचे. आजकाल टीव्ही च्या जमान्यात अनेक टीव्ही मालिका बनत असतात. आजकालचे अभिनेते. अभिनेत्री नाटक, सिनेमा सोबतच या रोज प्रदर्शित होणाऱ्या मालिकांमध्ये सुद्धा काम करतात.

अशाच झी मराठी वरील गाजलेल्या काही दिया परदेस मधला गाजलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री सायली संजीव. मित्रांनो सायली संजीव हिने यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

सायलीने आटपाडी, पोलीस लाईन, बस्ता तसेच गोष्ट एका पैठणीची अशा अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे. सायलीचे अनेक चित्रपट मालिकांप्रमाणेच हिट झालेले आहेत. तिच्याकडे अनेक चित्रपटाच्या ऑफर होत्या पण तिने कामाच्या व्यापामुळे काही मोजकेच चित्रपट आणि मालिका निवडल्या.

मित्रांनो सध्या सोशल मीडिया वर नवीन मराठी चित्रपट झिम्मा यावर बरीच चर्चा पाहायला मिळतेय. या मराठी चित्रपटांमध्ये सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, मृण्मयी गोडबोले सोबतच निर्मिती सावंत आणि सोनाली कुलकर्णी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अनेक तगडे कलाकार आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

झिम्मा हा चित्रपट येत्या 23 एप्रिल ला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. याच चित्रपटात आपण सायली संजीव ला सुद्धा पाहणार आहोत. हेमंत ढोमे याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सर्व मैत्रिणी युरोप फिरायला जातात अशी या चित्रपटाची कथा आहे.

या सहलीच्या ग्रुप मध्ये म्हाताऱ्या ते तरुण अशा सर्व वयोगटातील महिलांचा समावेश आहे. सायली सुद्धा याच ग्रुप मध्ये आहे. सायलीने या चित्रपटात एक अतिशय बोल्ड सिन केलेला आहे. तिचा हा लूक खूपच वायरल झालेला आहे. यावर बोलताना सायली म्हणाली कि चित्रपटाची गरज होती त्यामुळे तो सिन करणं जरुरी होतं.

आजकाल सोशल मीडिया वर खूप काही वायरल होत असतं. ती म्हणाली कि लोकांना तिचा हा अंदाज नक्की आवडेल.

पहा व्हिडीओ

व्हिडीओ क्रेडिट – राजश्री मराठी

मित्रांनो तुम्हाला काय वाटतं. सायलीला संस्कारी सुनेच्या रोल मधून या बोल्ड अवतारात प्रेक्षक स्वीकारतील का. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

अशाच सुंदर आणि मनोरंजक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here