बाळाचे भविष्य लिहिणारी ही सटवाई कोण आहे. यामागील काय आहे पौराणिक कथा. जाणून घ्या सटवाई बद्दल माहिती

0
864

नमस्कार मित्रानो

मित्रानो आज आपण सटवाई बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते. महाराष्ट्रामध्ये सटवाई बाळाचे भविष्य लिहिते असं जुन्या काळातील लोक म्हणतात. बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असेही म्हटले जाते. यामागील माहिती व पौराणिक कथा नेमकी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया.

सटवाईची पूजा बाथरूम मध्ये केली जाते. यानंतर एक रिकामा कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवला जातो. सटवाईची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक सर्व हिंदू लोक शिशु जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात. लहान बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो.

असे म्हणतात या वेळी सटवाई कुठल्यातरी रूपाने येऊन बाळाच्या कपाळावरती त्याचे भविष्य लिहिते. त्यासाठीच एक कोरा कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात. याच वेळेस बाळाच्या लल्लाट म्हणजेच कपाळावरील रेखा आखली जाते.

जेव्हा बाळ मधूनच जागे असताना किंवा झोपेत असताना हसते तेव्हा लोक म्हणतात की सटवाई सोबत बाळ हसत आहे. झोपेत सुद्धा बाळ हसलं तरी लोक म्हणतात कि सटवाई बाळाला हसवत आहे. सटवाई बद्दलची एक पौराणिक कथा आहे ती पुढीलप्रमाणे.

रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला. तेव्हा तिने आईला याबाबत विचारले तेव्हा सटवाईने उत्तर देण्यास टाळले. परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला. मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाईला म्हणते तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस मग माझे काय भविष्य आहे ?

यावर सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल. हे भविष्य ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते. काही दिवसांनंतर एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीवर पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते , त्यामुळे तिला दिवस जातात. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ते मुल ती जंगलात टाकून देते.

ते मूल एका राजाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे संगोपन करतो , पालन पोषण करतो. मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो. तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आईचे म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देऊ लागते.

दोघांचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते. हे कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले. थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही असा या कथेचा आश्रय आहे.

मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here