हे आहे जगातील सर्वांत मोठे पाप…

0
620

नमस्कार मित्रानो,

भगवान श्री कृष्णांनी भगवत गीतेमध्ये सर्वात मोठ्या पापा बद्दल सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला याच पापांबद्दल माहिती सांगणार आहोत. भगवान श्री कृष्ण सांगतात कि या श्रुष्टीत नेहमी 2 प्रकारचे व्यक्ती राहतात. त्यातील पहिले म्हणजे ते लोक जे नेहमी भगवंताचे नामस्मरण करतात व चांगले कार्य करतात. आपल्या हातून चुकूनही पाप घडू नये यासाठी प्रयत्नशील असतात.

दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती म्हणजे जे नेहमी पाप करण्याचाच विचार करतात. ते नेहमी वाईट व पापी कार्य करत राहतात. त्यांना चांगले कार्य करण्याची कितीही चांगली संधी मिळाली तरी सुद्धा ते फक्त पापच करत राहतात. त्यांच्या मनात नेहमी वाईट व अशुभच भरलेले असते. अशा व्यक्तींना वाईट गोष्टी करून असुरी आनंद मिळत असतो.

याउलट जे सज्जन व्यक्ती असतात त्यांना चांगले कार्य करताना दुःख व यातना जरी मिळाल्या तरीही ते सर्व सहन करून सर्व चांगले कर्म करीतच राहतात. चांगले कार्य करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. असे लोक प्रत्येक संधीचे सोने करतात. मनुष्याला त्याच्या पाप व पुण्याचा वाटा या जन्मात तसेच पुढील जन्मात देखील भोगावा लागतो.

मनुष्याने 100 पुण्याची कामे केली व एखादे मोठे वाईट कृत्य केले तर त्याने केलेले सर्व पुण्य शून्य होऊन जाते. ते केलेले पाप त्याच्या सर्व गुणांना झाकून टाकते. म्हणून मनुष्याने कधी पापाचा विचार मनात देखील आणू नये. मित्रांनो भगवान श्री कृष्णाने भगवत गीतेत पापापेक्षा महापापाचे वर्णन केलेले आहे. गुन्ह्यांपेक्षा मोठा गुन्हा आहे. असे पाप करणाऱ्या व्यक्ती मनुष्य जन्मातच नरक यातना भोगतात सोबत मृत्यूनंतर देखील पापाचे भोग भोगत राहतात.

म्हणून मनुष्याने चांगल्या किंवा वाईट कार्य करण्याची संधी मिळाली तर नेहमी चांगल्या कार्याची संधी निवडावी. वाईट कार्य करून आपल्या आत्म्याला त्रास होतो म्हणून वेळोवेळी वाईट कार्य करून आपल्या आत्म्याला दुखवू नये. चला तर मग जाणून घेऊया ती कोणती पाप आहेत जे या श्रुष्टीतील सर्वात मोठी पापे आहेत.

श्री कृष्ण सांगतात कि सर्वात मोठे पाप म्हणजे एखाद्या स्त्रीच्या अब्रूला ठेच पोहोचवणे. स्त्रीसाठी तिची अब्रू म्हणजे सर्वस्व असते. तिची अब्रू , लाज हेच तिचे प्राण असतात. या संपूर्ण सृष्टीला चालना देणारी स्त्री आहे. स्त्री आहे म्हणून ब्रह्मांड आहे. स्त्रीविना हि श्रुष्टि शून्य आहे. म्हणून एखाद्या स्त्रीचा अपमान करणे किंवा एखाद्या स्त्रीची अ ब्रू लुटणे, तिच्या सोबत वाईट कृत्य करणे हे सर्वात मोठे पाप आहे.

ज्याप्रमाणे अंध धृतराष्ट्राने द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी मौन धारण केले होते त्यामुळे त्यांच्या कुळाचा नाश झाला. म्हणून कोणत्याही स्त्रीच्या अब्रूवर हात टाकण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर याचे परिमाण कितीतरी जन्मापर्यंत भोगावे लागतील. हे आहे ते सर्वात मोठे पाप. जे भगवान श्री कृष्णांनी महाभारत व भगवत गीतेत सांगितलेले आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here