जगातील सर्वात मोठे पाप? जे तुम्ही रोज करता??..कृष्ण उपदेश || गीता ज्ञान…

0
220

नमस्कार मित्रानो

मित्रानो , जगातील सर्वात मोठे पाप कोणते? असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्हाला माहित आहे का याचे उत्तर? कोणत्याही व्यक्ती समोर पाप-पुण्याच्या गोष्टी केल्यास कोणतीही व्यक्ती जाणतेपणी पुण्य करण्याचे निवडेल.

परंतु हे देखील सत्य आहे की अजाणतेपणी का होईना आपल्या हातून पाप घडत असते. अनेक पुण्य करून देखील लोक एक असं महापाप करतात की, जे तुम्ही केलेल्या सर्व पुण्याचे फळ नष्ट करते. इतकेच काय तर या महापापाच्या कृत्याची शिक्षा या जन्मात तसेच पुढच्या अनेक जन्मात देखील भोगावी लागते.

या जगाच्या पसार्‍यात विभिन्न व्यक्तिमत्वाची अनेक वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची लोकं आहेत. काही लोकं असतात, जे आयुष्यभर पाप करत राहतात. तर काही लोकं खूप चांगले कार्य करत असतात.

जे जाणून-बुजून कधीही वाईट अथवा पाप करण्याचा विचार चुकून देखील करत नाहीत. आपण बोलताना वाणीने, मनात विचाराने, प्रत्यक्षात कृतीने निरंतर कर्म करत राहतो. आणि याच कर्माचे चांगले-वाईट फळ आपल्याला मिळत राहते. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सगळ्यात मोठे पाप कोणते आहे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या विश्वातील सगळ्यात महापाप म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या अब्रू सोबत खेळणे. होय, जी व्यक्ती कोण्या स्त्रीच्या अब्रूचा खेळ करते तो व्यक्ती या जगातील महापापी आहे.

गीतेनुसार नारी शक्ती एक अशी शक्ती आहे जिचा अंदाज घेणे मुश्किल आहे. स्त्रीला संसारात अतिशय पूज्य स्थान दिले गेले आहे. स्त्रीचा अपमान म्हणजे पूर्ण ब्रम्हांड उद्ध्वस्त करण्यासमान असते.

संसारात स्त्री प्रत्येक रुपात आपल्या बाळाचे पालनपोषण करत असते. जिला आपण प्रेमाच्या भाषेत आई म्हणून ओळखतो. या विश्वाची अर्धी शक्ती नारी आहे. कोणत्याही स्त्रीला विनाकारण त्रास देणारी व्यक्ती करोडो पापांची धनी बनते.

भगवान श्रीकृष्ण यांनी भगवत गीतेमध्ये सांगितले आहे की, जी व्यक्ती स्त्रियांचा आदर करते , मान सन्मान राखते ती व्यक्ती या जन्मी आणि पुढच्या जन्मी सुद्धा करोडो पुण्य प्राप्त करते.

दुसरीकडे असे लोकं जे स्त्रियांच्या अब्रूशी खेळतात, त्यांच्यावर हात उगारतात, शिवीगाळ करतात, त्यांच्यासोबत घाणेरडे कृत्य करतात तिथे त्यांच्या पुढील अनेक पिढ्या देखील पापाचे भागीदार बनतात.

म्हणूनच जगातील सर्वात मोठे पाप हे कोणत्याही स्त्रीचा अपमान करणे हे मानले जाते. म्हणून तुम्हीदेखील असं करण्यापासून वाचा. सर्व स्त्रियांचा मनापासून आदर करा. याच्यातच तुमचे भलं आहे.

एखाद्या स्त्रीसाठी तिची अब्रूच सर्व काही असते. तिची लाज हे तिचे प्राण असतात. स्त्रिविना ही सृष्टी शून्यवत आहे. महाभारतातील कथेनुसार अंध धुतराष्ट्र, भिष्मपितामह तसेच दुष्यासान व दुर्योधन यांचा शेवट कसा झाला हे आपण सर्व जाणतोच.

म्हणून चुकूनही कोणत्याही स्त्रीच्या अब्रुचा अपमान करू नका. कृतीने, विचाराने अथवा मनाने कोणत्याही स्त्रीला दुखवू नका. जगाला उदरातून अनेक कष्ट यातना सहन करून जन्म देणारी ती माऊली असते.

स्त्रीचे अस्तित्व खुद्द त्रीदेवांनी देखील मान्य करून सृष्टीच्या कार्यात आणि मान सन्मानात समान दर्जा दिला आहे. आपण तर साधी माणसं. तेव्हा असे महापाप चकूनही करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here