आज संकष्टी चतुर्थी. गजाननाच्या कृपेने या पाच राशींचे भाग्य चमकणार

0
276

नमस्कार मित्रांनो

मित्रानो जेव्हा मनुष्याच्या जीवनात परिस्थिती अतिशय बिकट बनते , कोणताच उपाय चालत नाही तेव्हा ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसल्या नंतर व्यक्तीचा भाग्योदय घडवून येण्यास वेळ लागत नाही.

आज संकष्टी चतुर्थी पासून असाच काहीसा शुभ संयोग या ५ राशींच्या जीवनात येणार असून गजाननाच्या कृपेने यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे. मित्रानो पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात. चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित असतो.

श्रावण महिन्यात येणारी हि संकष्टी चतुर्थी विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे. चतुर्थीला भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो.

मान्यता आहे कि या दिवशी व्रत उपवास करून भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट दूर होतात. श्री गणेश हे सुखकर्ता असून दुःखहर्ता आहेत. जेव्हा गजानन प्रसन्न होतात तेव्हा भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही.

आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजून १७ मिनिटांनी चतुर्थीला सुरवात होणार असून २६ ऑगस्टच्या दुपारी ५ वाजून १२ मिनिटांनी चतुर्थी समाप्त होणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या शुभ प्रभावाने या ५ राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

वृषभ रास

वृषभ राशीवर भगवान श्री गणेश विशेष प्रसन्न होणार आहेत. चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यवसायासाठी कार्यक्षेत्रात प्रगतीचे दिवस येणार आहेत. घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदात वाढ होण्याचे संकेत आहेत.

कर्क रास

कर्क राशीसाठी येणारा काळ लाभकारी ठरणार आहे. गजाननाच्या कृपेने आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. करियर विषयी हा काळ अनुकूल ठरणार असून करियर मध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल.

कार्यक्षेत्रात प्रगतीची नवी दिशा प्राप्त होईल. योजलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

कन्या रास

कन्या राशीच्या जीवनावर चतुर्थीचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. भगवान श्री गणेशावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार असून आपल्या जीवनात निर्माण झालेली संकट आता दूर होणार आहेत. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. पती पत्नी मधील प्रेमात वाढ होणार आहे. या काळात आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

धनु रास

धनु राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. हा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसानंतर आपल्या जीवनात अनुकूल काळाची सुरवात होणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे.

नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत. उद्योग व्यापारात भरभराट पहावयास मिळेल. अनेक दिवसांपासून मनाला सतावणारी चिंता आता दूर होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल.

मीन रास

मीन राशीसाठी अतिशय शुभ संकेत आहेत. गजाननाच्या कृपेने नशीब कलाटणी घेण्यास सुरवात करेल. येणाऱ्या काळात ग्रह नक्षत्र अनुकूल बनणार असून आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. हा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनप्राप्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here