मराठी मालिकेतील अभिनेत्रीचा जीन्स वरचा भन्नाट डान्स व्हिडीओ झाला वायरल…

0
532

नमस्कार मित्रांनो,

मराठी मनोरंजन वाहिनी स्टार प्रवाह वरच्या काही मालिका आजकाल लोकांच्या पसंतीला उतरत असल्याचं पहायला मिळत आहे.

यापैकीच एक मालिका फुलाला सुगंध मातीचा या मालिकेने सुरुवाती पासूनच लोकांना आपलंसं केलं आहे. या मालिके मधल्या शुभम आणि कीर्ती यांना लोकांनी खूप पसंती दिली. त्यांना प्रेम दिलं. या दोन पात्रांमुळेच मालिकेला प्रसिद्धी मिळाली आहे.

अभिनेता हर्षद अतकरी याने शुभम आणि समृद्धी केळकर हिने कीर्ती नावाचे पात्र मालिकेत साकारले आहे. किर्तीला आयपीएस अधिकारी व्हायचं असतं. ते तिचं स्वप्न असतं.

किर्ती हिचे तिच्या मना विरुद्ध शुभम सोबत लग्न लावून दिलं जातं. शुभम हा व्यवसायाने आचारी असतो. लग्न जरी मना विरुद्ध झालेलं असलं तरी हळूहळू दोघांच्या नात्यात प्रेम फुलत जातं.

सध्या या मालिकेत किर्ती चे पात्र साकारणाऱ्या समृद्धी केळकर चे काही डान्स व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

आजकाल सगळीकडे ट्रेंड वर असलेल्या ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ मराठमोळ्या गाण्यावर समृद्धी ने चक्क जीन्स वर डान्स केलेला पाहायला मिळत आहे.

मालिके मध्ये साडी मध्ये सोज्वळ रुपात दिसणाऱ्या समृद्धीला जीन्स मध्ये पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

समृद्धी ही उत्तम अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर उत्कृष्ट डान्सर असल्याचं देखील तिच्या या व्हिडीओ मधून दिसून येतं. समृद्धी उत्तम डान्सर आहे हे तिने सोशल मीडिया वर अनेक डान्स व्हिडीओ टाकले आहेत त्यातून दिसून येतं.

फुलाला सुगंध मातीचा ही मालिका टीआरपी मध्ये बराच काळ नंबर एक वर होती. सध्या ही मालिका चौथ्या नंबर वर आहे.

मालिकेत किर्ती आणि शुभम यांच्यात असलेला दुरावा कमी होत असलेला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात प्रेक्षकांना दोघांमध्ये असलेलं प्रेम पाहायला मिळेल.

पहा व्हिडीओ

मित्रांनो तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा.

अशाच मनोरंजन दुनियेशी संबंधित आणखी पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here