कोण आला रे कोण आला… मुंबईचा वाघ आला… रोहितचा फायनल मध्ये हिट विक्रम…

0
99

इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अंतिम सामना मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला आला होता. डावाच्या सुरुवातिच्या काही षटकातच त्याने एका खास विक्रमला गवसणी घातली.

रोहितने मुंबई इंडियन्सकडून खेळताना पूर्ण केल्या 4000 धावा

रोहितचा मुंबई इंडियन्सकडून खेळताना हा 155 वा सामना होता. 2011-2020 या कालावधीत मुंबई इंडियन्स कडून खेळताना त्याने 3992 धावा केल्या होत्या. 4000 धावा करण्यासाठी त्याला अवघ्या 8 धावांची गरज होती.

अंतिम सामन्यात त्याने पहिल्याच षटकांत षटकार ठोकला. त्यानंतर दोन धावा घेत त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 4000 धावांचा पल्ला गाठला. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करण्याच्या फलंदाजांच्या यादीत तो प्रथम क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :

रोहित शर्मा – 4000* धावा (155 सामने )
कायरान पोलार्ड – 3014 धावा ( 164 सामने )
अंबाती रायडू – 2416 धावा ( 114 सामने )
सचिन तेंडुलकर – 2334 धावा ( 78 सामने )
सूर्यकुमार यादव – 1397 धावा ( 47 सामने )

रोहीतची आयपीएल 2020 मधील कामगिरी

आयपीएल 2020 मध्ये रोहितने 11 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 24 च्या सरासरीने 264 धावा केल्या आहेत. 80 धावा ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.

अशाच क्रिकेट रिलेटेड पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here