नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो सैराट मधल्या रिंकू राजगुरूने म्हणजेच आपल्या लाडक्या आर्चीने अवघ्या महाराष्ट्राला वेडं करून सोडलं होतं. आज आपण रिंकु च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडं जाणून घेऊया.
रिंकु चा जन्म हा सोलापूर मधल्या अकलूज येथे 3 जून 2001 साली झाला. रिंकु ने फक्त 16-17 या वयात आपल्या अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं.
सैराट जसा प्रदर्शित झाला तसं लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात फक्त आर्चीचंच नाव होतं. सैराट ने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता.
मित्रांनो रिंकु ने आपले शालेय शिक्षण जिजामाता कन्या प्रशाला अकलूज येथून पूर्ण केले. 2016 मध्ये रिंकु शाळा सोडून देणार अशा अफवा सुद्धा पसरल्या होत्या. कारण रिंकु चे फॅन तिच्या शाळेत तिला भेटायला गर्दी करायचे.
रिंकुचे आई वडील हे दोघेही शिक्षक असल्यामुळे त्यांनी रिंकुला बाहेरून 10 वीची परीक्षा देण्यास सुचवलं. आई वडिलांच्या सुचने नुसार तिने 10 वीची परीक्षा बाहेरून दिली. रिंकुला 10 वीला 66 टक्के मार्क्स मिळाले होते.
मित्रांनो रिंकु लहान पणा पासूनच खूप हुशार होती. पहिली पासूनच रिंकूने प्रत्येक वर्गात 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले होते. 9 वी मध्ये सुद्धा रिंकुला 81 टक्के गुण मिळाले होते.
रिंकु च्या आई वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले होते की रिंकु लहानपणापासूनच खूप डॅशिंग होती. रिंकुला डान्स ची खूप आवड होती. ती लहानपणापासूनच डान्स मध्ये भाग घ्यायची. या सोबतच तिला रांगोळी आणि मेहंदी काढायला सुद्धा खूप आवडते.
मित्रांनो रिंकुचे स्वप्न होतं की आपण डॉक्टर होऊन आई वडिलांचे नाव खूप मोठं करायचं. पण जेव्हा रिंकु ने सैराट मधून अफाट लोकप्रियता मिळवली तेव्हा ती जिथे जाईल तिथे तिचे फॅन तिचा पाठलाग करू लागले.
रिंकु जेव्हा 7 वी मध्ये होती तेव्हाच तिला सैराट च्या आर्ची चा रोल मिळाला होता. नागराज मंजुळे यांनी पाहताच क्षणी रिंकुला फायनल केलेलं होतं.
रिंकु ने सैराट मध्ये सर्व स्टं ट स्वतः केलेले आहेत, जसं की विहिरीत उडी मारणे, बुलेट चालवणे, ट्रॅक्टर चालवणे इत्यादी. सैराट साठी रिंकुला राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.
रिंकु आणि आकाश ठोसर या दोघांनी कपिल शर्मा च्या शो मध्ये हजेरी लावली. मित्रांनो सैराट ने 100 करोड ची कमाई केली होती.
सैराट नंतर रिंकु ने सैराट चा कन्नड रिमेक मध्ये सुद्धा काम केलं. तिने कागर या सिनेमात सुद्धा मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर तिने हंड्रेड या वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केलं आहे.
रिंकु राजगुरुला उर्फ आपल्या लाडक्या आर्ची ला मराठी धिंगाणा ऑनलाईन टीम कडून तिच्या भावी आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा.
अशाच सुंदर आणि मनोरंजक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.