नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपण आपलं घर सजवण्यासाठी कितीतरी वस्तू वापरत असतो. पण घर सजवण्याच्या नादात आपण काही अशा वस्तू सुद्धा वापरतो, की ज्यामुळे आपल्या घरातील सुख शांती निघून जाते.
घराची सजावट करताना वास्तू शास्त्रावर लक्ष ठेवणं हे खूपच आवश्यक आहे. मित्रांनो आपलं किचन, लिविंग रूम, बेड रूम सोबतच घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लागलेल्या सजावटीच्या वस्तू सुद्धा आपल्या जीवनात चांगला किंवा वाईट प्रभाव पाडतात.
मित्रांनो आज आपण अशा काही वस्तू पाहणार आहोत ज्या आपण कधीही आपल्या घरात ठेऊ नयेत.
वास्तू शास्त्रानुसार अशा वस्तू घरात ठेवल्यास घरात भांडणं होतात. आपल्या घरातील व्यक्ती आजारी पडण्या बरोबरच घरात आर्थिक तंगी भासू लागते.
चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तू आहेत त्यामुळे आपलं भाग्य हे दुर्भाग्यात परावर्तित होते.
1) काटेरी वनस्पती
मित्रांनो पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे काटेरी वनस्पती. काटेरी वनस्पती घरात लावल्यास आपल्या घरातील सदस्यांची मानसिक स्थिती खराब होते. त्यांचे भाग्य त्यांना साथ देत नाही.
त्याच बरोबर ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा पांढरा पदार्थ निघतो अशी वनस्पती किंवा झाड हे आपल्या घरात की घराच्या आसपास लावू नये.
2) तुटलेले फुटलेले सामान
मित्रांनो काही व्यक्तींना जुन्या तुटलेल्या, फुटलेल्या वस्तू सांभाळून ठेवायची सवय असते. पण मित्रांनो या जुन्या तुटलेल्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
तुटलेल्या वस्तू, फुटलेला आरसा, काचेचे सामान हे लगेच घरातून बाहेर काढावे.
3) बंद घड्याळ
मित्रांनो आपल्या घरात बंद झालेले किंवा खराब झालेले घड्याळ असेल, तर त्यामुळे आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांचे कोणतेही काम हे वेळेवर पूर्ण होत नाही.
घड्याळ बंद असेल तर त्याने आपलं नशीब सुद्धा बंद पडतं असं म्हणतात. त्यामुळे बंद घड्याळ असेल ते दुरुस्त करून चालू करून घ्या किंवा मग ते घड्याळ फेकून द्या.
4) जुने फाटलेले कपडे
मित्रांनो जर आपल्या घरी जुने फाटलेले कपडे असतील तर त्यातून सुद्धा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. फाटलेले कपडे पाहून आपल्या मनात वाईट विचार सुद्धा येतात.
त्यामुळे जुने कपडे स्वच्छ धुवून, शिवून एखाद्या गरजु व्यक्तीला द्यावेत.
5) कोळ्याचे जाळे
मित्रांनो आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की आपल्या घरच्या कोपऱ्यात कोळ्याचे जाळे बनलेले असतं. मित्रांनो घरात असं जाळं कधीही लागू देऊ नका. या मुळे घरातील लोक जाळ्यात अडकू शकतात. म्हणजेच ते कोणत्या तरी संकटात अडकू शकतात.
कोळ्याच्या जाळ्यामुळे आपले चांगले दिवस हे वाईट दिवसात बदलतात. वास्तू शास्त्रानुसार घरात किंवा दुकानात जाळे असेल तर ते अशुभ मानले जाते. त्यामुळे तुम्हाला जाळे दिसले तर ते लगेच काढा. कारण त्यामुळे वास्तू दोष निर्माण होतात.
6) हिं सक फोटो किंवा चित्र
मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला आपल्या घरात भिंतीवर चित्र, फोटो फ्रेम लावतो. बऱ्याच वेळेस या फ्रेम मध्ये जंगली प्राणी शिकार करत आहे असं चित्र असतं. हिं सक प्राण्याचे फोटो असतात.
बुडणारे जहाज असणाऱ्या फ्रेम सुद्धा असतात. युद्धाचे फोटो, दुखद घटनांचे फोटो सुद्धा लावले जातात.
मित्रांनो अशा प्रकारच्या चित्रांमुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे आपले मन अस्वस्थ होते, आपले विचार हिं सक बनतात. घरात नेहमी निराशेचे वातावरण राहते. त्यामुळे अशा फोटो फ्रेम, चित्रे लावणे टाळा.
7) देव देवतांच्या तुटलेल्या मूर्ती
मित्रांनो बऱ्याच वेळेस आपल्या कडून आपल्या घरी असलेल्या देवी देवतांच्या मूर्तीचे नकळतपणे नुकसान होते, त्या मूर्तींना नकळतपणे आपल्याकडून इजा होते.
त्या मूर्तींचे हात किंवा इतर अवयव तुटतात. तसेच फोटो फ्रेम असतील तर त्या फ्रेमच्या काचेला तडे गेलेले असतात. काही फोटो फ्रेम फाटलेल्या अवस्थेत असतात.
अशा मूर्ती आणि फोटोंमुळे आपल्या घरी आर्थिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे असे फोटो आणि मूर्ती या वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात.
एकाच देवी देवतेचे अनेक फोटो लावू नयेत. त्या देवी देवतांना त्यांच्या योग्य स्थानावरच ठेवावे. मित्रांनो एकाच देवाचे 3 फोटो असतील तर तो सुद्धा एक वास्तू दोष समजला जातो.
8) भंगार सामान
मित्रांनो घरात वापरात नसलेले जुने सामान, भंगार साठवून ठेऊ नये. याने नकारात्मक ऊर्जा वाढते. आपल्या घरात वास्तू दोष लागतो. पितृ दोष सुद्धा लागतो. त्यामुळे घरातून भंगार आणि वापरात नसलेले सामान लगेच बाहेर काढावे.
9) पाकिटात असलेल्या अनावश्यक वस्तू
मित्रांनो आपण अनेकदा आपल्या पाकिटात चावी, चिठ्या, जुनी बिले सांभाळून ठेवतो. पण या मुळे आपल्या पाकिटात लक्ष्मी टिकत नाही.
पाकिटात असलेले जुने कागद नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे आपल्या पाकिटात पैसा टिकत नाही. अकारण पैसा खर्च होतो. त्यामुळे पाकीट हे नेहमी स्वच्छ असावे. पाकिटात पैशां व्यतिरिक्त इतर कोणतेही सामान ठेऊ नये.
मित्रांनो पाकीट फाटले असेल, तर ते बदलून नवीन पाकीट घ्यावे.
10) तिजोरी गंज लागलेली असेल
मित्रांनो बऱ्याच जणांच्या घरी तिजोरी असते, आपण या तिजोरीत पैसे, मौल्यवान वस्तू, सोने वगैरे ठेवतो. पण बऱ्याच लोकांच्या घरी तिजोरी जुनाट, गंज लागलेली असते.
तिजोरी मध्ये माता लक्ष्मी चा वास असतो. त्यामुळे आपली तिजोरी गंज लागलेली असेल तर ती रंग लावून वापरावी. रंग लावणं शक्य नसेल आणि तिजोरी खूपच जुनाट असेल तर ती बदलावी.
तिजोरी मध्ये सर्व प्रकारचे कागदपत्रे ठेऊ नयेत. आपले महत्त्वाचे कागद पत्र, दाखले इत्यादी ठेवण्यासाठी दुसरी जागा असावी. तिजोरीत फक्त मौल्यवान वस्तू, दाग दागिने, पैसा ठेवावा.
मित्रांनो या काही वस्तू सांगितल्या आहेत ज्या आपल्या घरात असतील तर आपली प्रगती होत नाही. तर त्या वस्तू आपल्या घरातून लगेच बाहेर काढा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.