नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ,
मित्रांनो 19 फेब्रुवारीला शुक्रवारच्या दिवशी रथ सप्तमी येत आहे. रथ सप्तमी म्हणजेच खूप महत्वाचा दिवस. मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल कि हळदी कुंकुवाचा हा शेवटचा दिवस असतो.
विवाहित महिला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम या दिवसांमध्ये करत असतात. आणि रथ सप्तमीला याचा शेवट असतो. मित्रांनो रथ सप्तमी हि विशेष मानली जाते कारण या दिवशी आपण भरपूर असे उपाय करू शकतो व त्याचे फायदे मानवाला होतात.
या दिवशी काही उपाय केल्याने सुख समृद्धी आपल्या घरी नांदते, आपल्या इच्छा पूर्ण होतात. तर मित्रांनो 19 फेब्रुवारीला रथ सप्तमी आहे. या दिवशी विवाहित महिलांनी हा एक उपाय केला तर नक्कीच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढेल.
पतीला भविष्यात कोणतेच संकट येणार नाही आणि घरात धानाचे मार्ग मोकळे होऊन धनप्राप्ती होऊ लागेल. विवाहित महिलांनी या ठिकाणी फक्त एक मूठ तांदूळ ठेवायचे आहेत.
हा उपाय केल्यानंतरच त्यांना लाभ मिळेल. आता एक मूठ तांदूळ कुठे आणि कसे ठेवायचे? मित्रांनो 19 फेब्रुवारीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही देव पूजा कराल तेव्हा सुद्धा हा उपाय करू शकता.
महिलांनी देव पूजा करताना एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. देवपूजा झाल्यानंतर ते वाटीतील तांदूळ आपल्या मुठीत घ्यायचे आहेत. मुठीत घेतल्यानंतर आपली जी काही इच्छा, अपेक्षा, समस्या, अडचणी जे काही असेल ते सर्व बोलायचं आहे.
इच्छा अपेक्षा बोलून झाल्यावर पुन्हा तांदूळ त्या वाटीत टाकायचे आहेत. आणि ती वाटी 19 फेब्रुवारीच्या रात्री देवघरातच ठेवायची आहे. ते तांदूळ वाटीत ठेवा, ताटलीत ठेवा किंवा देवघरात लाल कपड्यावर ठेवले तरी चालतील.
रात्र भर ते तांदूळ तिथे ठेवून द्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर ते तांदूळ तिथून उचलायचे आहेत आणि ते तांदूळ कोणत्याही पक्षाला, प्राण्याला, गाईला किंवा कोणत्याही गरजू व्यक्तीला ते दान म्हणून देऊ शकता.
मित्रांनो गाईला देणे जमत नसेल, दान करणे जमत नसेल, पक्षाला देणे जमत नसेल तर वाहत्या पाण्यात सुद्धा हे तांदूळ तुम्ही विसर्जित करू शकता. तर अशा पद्धतीने हा उपाय रथसप्तमीच्या दिवशी नक्की करावा. याने लाभ नक्कीच होईल.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.