नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी होत असते. याला आरोग्य सप्तमी देखील म्हटले जाते. हा दिवस ग्रहांचे राजा आणि ऊर्जेचे स्रोत भगवान सूर्यदेवाचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.
या दिवसापासून भगवान सूर्यदेव आपल्या सात घोड्याच्या रथावर बसून विचरण करण्यास सुरवात करतात. याला अर्थ आरोग्य सप्तमी म्हटले जाते. भगवान सूर्यदेव संपूर्ण ब्रह्मांडाला ऊर्जा प्रदान करत असून आरोग्याचे दाता आहेत.
ज्योतिषशात्रा मध्ये सूर्यदेवाला विशेष महत्व प्राप्त असून सूर्याला ऊर्जेचे कारक मानले जाते. सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते. जन्म कुंडलीमध्ये सूर्य जेव्हा शुभ स्थिती मध्ये असतो तेव्हा त्या राशीच्या जातकांना मानसन्मान, पदप्रतिष्ठा आणि धनसंपत्तीची प्राप्ती होते.
जेव्हा सूर्याची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. रथ सप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून व्रत धारण करून पवित्र स्नान केल्या नंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते.
त्यानंतर भगवान सूर्यदेवाची पूजा करून आदित्य स्तोत्राचा पाठ केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. रथ सप्तमीचे व्रत केल्याने आरोग्याची प्राप्ती होते. व्यक्तीच्या शरीरात असणारे रोग दूर होतात.
भगवान सूर्यदेवाची उपासना केल्याने पद्प्रतिष्ठा, मानसन्मानाची प्राप्ती होते. नोकरी मध्ये बढतीचे योग येतात. रथ सप्तमीचे व्रत केल्याने मनुष्याचे भाग्य प्रबळ बनते. आध्यात्मिक उन्नती होते. भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्ती बरोबरच आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होते.
मित्रांनो आज मध्य रात्री नांतर माघ शुक्ल पक्ष कृतिका नक्षत्र रथ सप्तमी दिनांक 19 फेब्रुवारी रोज शुक्रवार लागत आहे. रथ सप्तमी आणि शुक्रवार हा अतिशय शुभ संयोग बनत आहे. पंचांगा नुसार चंद्र आणि मंगळ अशी युती होत आहे.
हा संयोग या भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभ ठरणार असून आज पासून पुढे येणाऱ्या काळात या राशींच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडण्यास सुरवात होणार आहे. या सप्तमीपासून भगवान सूर्यदेव आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.
या काळात धनसंपत्तीचे योग बनत आहेत. आता आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होणार असून सुख समृद्धी, ऐश्वर्य आणि वैभवाची प्राप्ती होणार आहे. भगवान सूर्यदेवाची कृपा आता आपल्या राशीवर बरसणार आहे.
सृयदेव हे ग्रहांचे राजा मानले जातात. जेव्हा राजाची कृपा बरसते तेव्हा जीवनात कशाचीही म्हणून उणीव राहत नाही. असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ आपल्याही जीवनात येणार आहे.
या काळात आपल्या ऊर्जेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. करियर मध्ये प्रगतीचे संकेत असून उद्योग व्यापारात भरभराट पहावयास मिळेल. ज्या राशी विषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, सिंह, कन्या, तुळ आणि वृश्चिक रास.
तर मित्रांनो या आहेत त्या राशी ज्यांचे नशीब सातव्या शिखरावर राहणार आहे. माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा.
सूचना : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.