नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो या महिन्यातील महत्वाचा सण किंवा उत्सव म्हणजे रामनवमी. यावर्षी रामनवमी 21 एप्रिलला आलेली आहे. श्री राम नवमीचं खूप जास्त महत्व असत.
गुढी पाडव्या पासून म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चैत्र नवरात्री सुरु होते ती रामनवमीच्या दिवशी संपत असते.रामनवमीच्या दिवशी प्रभू विष्णूला, प्रभू रामाला आणि स्वामी समर्थांना प्रसन्न करून त्यांची कृपा मिळवण खूप महत्वाचं असत.
तर मित्रांनो रामनवमीच्या दिवशी घरामध्ये तुम्हाला एक उपाय नक्की करायचा आहे. या उपायाने तुमच्या घराची भरभराट होईल व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला हवे ते मिळेल.
मित्रांनो लक्षात ठेवा हा उपाय विश्वासाने आणि मनोभावनेने करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला फक्त एक मूठभर तांदूळ लागणार आहेत . हे तांदूळ तुम्ही एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत.
तांदूळ वाटीमध्ये ठेवल्यानंतर ती वाटी तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायची आहे. रामनवमीच्या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. याला कुठल्याही विशिष्ट वेळेची गरज नाही.
मित्रांनो देव घरात तांदूळ ठेवल्यानंतर हळदी कुंकू वाहून त्या तांदळाची तुम्हाला पूजा करायची आहे, अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर तुम्हाला रामरक्षा मंत्राचा जप करायचा आहे. याने तुमच्या घराचे रक्षण होईल.
त्यानंतर अगरबत्तीची थोडी उदी तांदुळावर टाकून ते तांदूळ एका कागदामध्ये किंवा कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे बांधलेले तांदूळ आपल्या घरातील तिजोरीमध्ये, जिथे आपण पैसे ठेवतो तिथे, जिथे दाग दागिने ठेवतो तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता.
मित्रांनो अगदी सोप्पा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी कुठलाही खर्च करण्याची आवश्यकता नाही. आपल्या दररोजच्या पूजेमध्ये बदल करून आपल्याला हा उपाय करायचा आहे.
हा उपाय केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल घडून येतील. आपलं जीवन सकारात्मकतेने भरून जाईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.