21 एप्रिल रामनवमी बोला हा 1 मंत्र भगवान श्रीराम प्रसन्न होऊन करतील सर्व ईच्छा पूर्ण…

0
298

नमस्कार मित्रांनो,

एप्रिल महिन्यातील आणखीन एक उत्सव, एक सण म्हणजे रामनवमी. यावर्षी 21 एप्रिल बुधवार रोजी रामनवमी आलेली आहे. याच दिवशी भगवान श्री रामाचा जन्म झाला होता. मित्रानो राम या नावामध्येच अपार शक्ती आहे.

हे नाव लिहिलेले दगड देखील पाण्यामध्ये बुडाले नाहीत. ज्यांच्या नावामध्येच इतकी शक्ती आहे त्यांच्या मंत्रा मध्ये किती शक्ती असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तर मित्रांनो रामनवमीच्या दिवशी या मंत्राचा जाप केल्याने प्रभू राम आपल्यावर प्रसन्न होतील.

आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या भाग्यवान श्री रामाच्या कृपेने पूर्ण होतील. मित्रांनो शास्त्रात एक कथा सांगितली जाते कि एकदा भगवान श्री शंकर आणि माता पार्वती कैलासा मध्ये असताना श्री महादेव माता पार्वतींना जेवणासाठी बोलावतात.

त्यावेळी माता पार्वती विष्णुसहस्त्र नामाचा पाठ करत असतात. तुम्ही थोडा वेळा थांबा असे त्या भगवान शिवशंकरांना म्हणतात. भगवान श्री शंकर काही वेळ प्रतीक्षा करतात परंतु बराच वेळ झाला तरी माता पार्वतीचा विष्णुसहस्त्र नामाचा पाठ काही पूर्ण होत नाही.

तेव्हा भगवान महादेव माता पार्वतीला म्हणतात हे पार्वती तू राम नामाचा जप कर. कारण राम नामाचा एकदा जाप केल्याने श्री हरी विष्णूंच्या एक हजार नामांचे म्हणजेच विष्णुसहस्त्र नामाचे पठण केल्याचे पुण्य आपल्याला लाभते.

विष्णुसहस्त्र नामाच्या पाठाचे आणि एकदा राम म्हटल्याचे पुण्य जे आहे ते समतुल्य आहे. हे ऐकल्यानंतर माता पार्वती राम नामाचा जाप करतात आणि भगवान श्री शंकरांसोबत भोजन ग्रहण करतात.

तर मित्रांनो अशी या राम नामामध्ये अद्भुत शक्ती आहे. मित्रांनो रामनवमीच्या पावन दिवशी आपण श्री राम नामाचा जप अवश्य करा. सोबतच या दिवशी आपल्याला श्री राम तारक मंत्र याचे देखील पठण करायचे आहे.

जर तुमच्यावर किंवा घरातील कुठल्या सदस्यावर कोणाची वाईट नजर असेल किंवा काही बाधा असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण राम नवमीच्या दिवशी राम तारक मंत्राचा शक्य तितक्या वेळा जप करायचा आहे.

तुम्ही हा जाप 21 वेळा, 108 वेळा किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे कितीही वेळा हा मंत्र म्हणू शकता. हा श्री राम तारक मंत्र असा आहे

” राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ” ” राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने “

मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या मंत्राचा जाप करायचा आहे. मित्रांनो राम नवमीच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा अवश्य जाप करा अवश्य पठण करा. यामळे तुमच्या घराचे रक्षण होईल, घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्तीचा वास राहील.

भगवान श्री रामांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. काही दिवसातच तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका. धन्यवाद.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here