नमस्कार मित्रानो
मित्रानो जर लग्नच खऱ्या प्रेमाचा शेवट आहे तर मंदिरात भगवान कृष्णा सोबत राधाची पूजा नसती झाली. आपण सर्व राधा-कृष्ण यांच्या प्रेमाची गोष्ट ऐकत मोठे झाले आहोत. त्यांची मैत्री, प्रेम आणि कायम सोबत राहण्याची ओढ बघून आपणही आपल्या जीवनात असं प्रेम मिळावं याची कामना करतो.
यांच्या प्रेमामुळेच आपण प्रेमावर विश्वास करणे शिकलो. जेव्हा आपण कोणी प्रेमीयुगुलांना बघतो तेंव्हा आपल्याला राधा कृष्णची आठवण येतेच. तुम्हाला आठवत का जेंव्हा तुम्हाला पहिल्यांदा समजलं होत की राधा कृष्णने लग्न केले नाही तेंव्हा तुम्हाला कसे वाटले होते?
ते एकमेकांसाठी बनले होते तर त्यांनी लग्न का केले नाही अस वाटलं असेल. आज आम्ही तुम्हाला राधा कृष्ण ही दोन नाव विवाह बंधनात का अडकली नाही या प्रश्नाबद्दल उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा ने नाही तर राधा ने दिला होता विवाहास नकार. राधा एक गवळ्याची मुलगी होती आणि भगवान कृष्ण एक राजकुमार होते. तेंव्हा त्यांचं लग्न कोण्या राजकुमारी सोबत व्हायला हवं होत असा तिचा विचार होता.
लोकांनाही कृष्णाचे लग्न कोण्या राजकुमारी सोबत व्हायला हवे असे वाटत होते. भगवान कृष्णाने तिची खूप समजूत घातली. एका धार्मिक उल्लेखानुसार कृष्णाने सांगितले कि कोणी आपल्याच आत्म्यासोबत विवाह कसे करू शकतो?
राधा आणि कृष्ण वेगळं अस्तित्व नसून एकच आहेत. लग्न करण्यासाठी दोन लोकांची गरज असते. मग अशा परिस्थितीमध्ये दोघांचा विवाह एकत्र कसा संभव आहे? असं सांगितलं जात, अनेक लीला करणारे श्रीकृष्ण जगाला धडे शिकवण्यासाठी आले होते.
खऱ्या प्रेमाचा अर्थ त्या व्यक्तीला मिळवणे असा नसतो. असा संदेश त्यांना जगाला द्यायचा होता. राधा कृष्णाचे प्रेम निर्मळ होते ज्यात वासना, शारीरिक संबंध यातील काहीही नव्हते. त्यांच लग्न झालं नाही परंतु त्यांच प्रेम दिव्य आणि आध्यात्मिक आहे.
राधा सोबत श्रीकृष्ण धरतीवर त्यासाठीच आले होते की जगाला खरं प्रेम काय आहे ते समजावे. प्रेमाला नातं, ओढ असण्याची गरज नसते. असं सांगितलं जातं की, राधेला कृष्ण हे साक्षात देव आहे हे समजले होते. ती एका सच्चा भक्त प्रमाणे भगवान कृष्णांवर प्रेम करत होती.
जुन्या मान्यतेनुसार ऋषि भृगु यांनी शाप दिलेली कथा आहे. कारण भगवान विष्णू यांना प्रत्येक जन्मी प्रेमापासून वेगळं होऊन तो त्रास जाणवण्याचा शाप मिळाला होता. भृगु ऋषींच्या दुसऱ्या पत्नीचा वध केल्याने त्यांनी विष्णूला शाप दिला. वध करावा लागला कारण त्यांची पत्नी असुरांना लपवत होती. ऋषीना हे माहित नव्हते.
अनेक जण असेही सांगतात राधा कृष्ण विवाह श्रीधामच्या शापामुळे होऊ शकला नाही. श्रीधाम कृष्णाचा मित्र आणि भक्त होता. त्याला असं वाटत नव्हतं की कृष्णाच्या आधी राधाचे नाव जोडले जावे.
त्यानी राधाला विसरण्याचा शाप दिला. काही पौराणिक कथांनुसार राधा श्रीकृष्ण पेक्षा पाच वर्षांनी मोठी होती. दोघात मैत्री मग प्रेम झाले. समाजाला हे बघवत नव्हते. गर्ग ऋषींनी देखील कृष्णाला जन्माचा उद्देश सांगितला होता.
धर्म स्थापना या कार्यामध्ये लक्ष दिले पाहिजे. असा सल्ला त्यानी दिला. आणि त्यांना राधाला सोडून जावेच लागले. तुम्हाला देखील कधी कोणावर खरं प्रेम झालय? ते तुम्हाला मिळालं नाही? तर निराश होऊ नका. कारण प्रेमाचा अर्थ मिळवणे असता तर प्रत्येकाच्या हृदयात राधा कृष्णा चे नाव नसते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.