18 ऑगस्ट पुत्रदा एकादशी. विवाहित महिलांनी पुत्र प्राप्तीसाठी , मुलांच्या भविष्यासाठी करावे हे व्रत

0
290

नमस्कार मित्रानो श्री स्वामी समर्थ

मित्रानो पुत्रदा एकादशीला ज्या महिलांना पुत्र प्राप्ती होण्यास बाधा निर्माण होत आहेत अशा महिला सुद्धा हे व्रत करू शकतात. ज्यांना पुत्र सुख प्राप्त झाले अशा महिलांनी त्यांच्या सुखी भविष्यासाठी , दीर्घायुषी होण्यासाठी हे व्रत करायचे आहे. व्रत करण्याची एकदम सोप्पी पद्धत आहे.

मित्रानो एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान विधी करून देवासमोर बसायचं आहे. अगरबत्ती , दिवा लावून भगवान श्री हरी श्री विष्णूचे स्मरण करायचे आहे. त्यानंतर एका ग्लास मध्ये पाणी घ्यायच आहे , आणि एक ताम्हण किंवा ताट घ्यायचा आहे.

त्यानंतर हातात पाणी घेऊन तुम्हाला संकल्प सोडायचा आहे कि मी आज संतान प्राप्तीसाठी किंवा मुलांच्या सुखी भविष्यसाठी किंवा त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत आहे. एवढे बोलून ते पाणी तुम्हाला त्या ताम्हणात टाकायचे आहे.

त्यानंतर विष्णू देवांची पूजा , समरण करायच आहे. त्यानंतर बाळ कृष्णाची पूजा करायची आहे. ११ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे. या सर्व विधी सकाळी करून उपवासाला सुरवात करायची आहे.

या उपवासात तुम्ही फलाहार करू शकता . म्हणजे फळे तुम्ही खाऊ शकता. परंतु तिखट किंवा मीठ टाकलेल्या कोणत्याही अन्नाचे ग्रहण करायचे नाहीये. रात्री तुम्ही फराळाचे काही खाऊ शकता. तुम्हाला हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ तारखेला तुम्ही उपवास सोडू शकता. मित्रानो एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पुन्हा श्री विष्णूंची पूजा अर्चा करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. रात्री फराळाचे बनवून खायचं आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान विधी झाल्यानंतर पुन्हा श्री विष्णूंची पूजा अर्चा करून मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दुपारी जेव्हा कधी जेवाल त्या आधी देवांना तुम्ही जेवण जे काही बनवाल त्याचा नैवैद्य देवांना दाखवायचा आहे. त्यानंतर त्याच नैवैद्याने तुम्ही उपवास सोडायचा आहे.

असे हे व्रत महिलांनी आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी , दीर्घायुष्यासाठी , संतान प्राप्तीसाठी करायचा आहे. मित्रानो हे व्रत तुम्ह उद्या नक्की करा. स्वामी इच्छित फळ दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त मनात कोणतीही शंका न ठेवता हे व्रत करा . फळ निश्चित मिळेल. श्री स्वामी समर्थ.

मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरु नका.

वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here