नमस्कार मित्रांनो,
उद्या आपले हिंदू नवीन वर्ष सुरू होणार आहे, आणि या नवीन वर्षी आपण जर आपल्या घरामध्ये काही वस्तू आणल्या तर त्यामुळे आपल्या घरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास नक्कीच कायम राहतो.
आता नवीन वर्ष सुरू होत आहे, हे नवीन वर्ष आपल्या घराला सुखा समाधानाचे जाओ, आपल्या घराला कोणाची नजर लागू नये, घरात कोणतेही आजार येऊ नयेत, घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येऊ नये, शनी दोष, ग्रह दोष यांच्या पासून आपले घर वाचावे.
आपल्या घरात पैशाचा ढीग लागावा, आपल्या घरात माता लक्ष्मी चा सदैव वास रहावा यासाठी मित्रांनो आपल्या घरी या 5 वस्तू आपण नक्की घेऊन या.
उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे तेव्हा नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी आपण या वस्तूंची खरेदी नक्की करा.
आज आपण त्या 5 वस्तू कोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत.
1) लक्ष्मी गणेशाची मूर्ती
मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती. तसे तर आपण दिवाळी असो किंवा इतर कोणत्याही धार्मिक पूजे प्रसंगी लक्ष्मी गणेशाच्या मूर्तीची खरेदी करतोच.
पण नवीन वर्ष सुरू होत असताना जर आपण या शुभ प्रसंगी माता लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती जर घरी आणली तर संपूर्ण वर्ष आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. आपल्या घरी धन दौलत कधीही कमी पडत नाही.
याचं कारण असं आहे की भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत, आपल्या घरावर काही दुःख येईल, संकट येईल, विघ्न येईल त्याचं हरण करण्याचं काम हे भगवान गणेश करत असतात.
माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे. धन संपत्ती मध्ये वाढ होण्यासाठी, असलेल्या धनामध्ये वाढ होण्यासाठी माता लक्ष्मी ची मूर्ती खरेदी करा.
मित्रांनो मूर्ती खरेदी करत असताना गणेश आणि माता लक्ष्मी हे एकत्र एका मूर्ती मध्ये असतील याची काळजी घ्यायची आहे.
2) गोड पदार्थ
मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे, जो मुख्य व्यक्ती आहे त्याने आपल्या घरी गोडधोड काहीतरी घेऊन यावं. कोणताही एक गोड पदार्थ त्याने आपल्या घरी आणावा.
मित्रांनो असं म्हणतात की कोणत्याही शुभ कार्यात गोड वस्तू असायलाच हवी. किमान साखर किंवा गूळ हा असलाच पाहिजे. नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात उत्साही वातावरणात व्हावी, आल्हाददायक व्हावी यासाठी गोडधोड किंवा मिठाई आणावी.
मित्रांनो मिठाई आणल्यानंतर सर्वप्रथम ती आपल्या घरातील देवघरात ठेवावी. देवांना सर्वप्रथम भोग चढवावा, नैवेद्य दाखवावा. त्यानंतर घरातील सर्व व्यक्तीनी एकत्र बसून तो पदार्थ ग्रहण करायचा आहे.
मित्रांनो असं केल्याने विजय प्राप्ती होते. म्हणजे आपल्या घराचा जो उद्योग असेल, व्यवसाय असेल त्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश प्राप्ती होते. आपल्याला विजय मिळतो.
आपल्याला कोणत्याही कामात अडथळे येत नाही. आपली कामे सकारात्मक रित्या मार्गी लागतात.
3) पंचमुखी हनुमान प्रतिमा
मित्रांनो 3 रि वस्तू जी आहे ती म्हणजे हनुमान प्रतिमा. शक्य झाले तर ती प्रतिमा पंचमुखी हनुमानाची असावी. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण पंचमुखी हनुमानाची प्रतिमा, फोटो खरेदी करा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारा वर बाहेरच्या बाजूला लावा.
मित्रांनो असं म्हणतात की ज्या ठिकाणी पंचमुखी हनुमान असतात त्या घरावर शनीचा दोष लागत नाही. भूत प्रेत या गोष्टी त्या घरापासून लांब राहतात. कोणत्याही प्रकारच्या दुष्ट शक्ती, दुष्ट आत्मा हे त्या घराकडे फिरकत सुद्धा नाहीत.
आपल्या घरच्या मुख्य प्रवेशद्वारावर हनुमानाची प्रतिमा लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा खेळती राहते, आपल्यावर हनुमानाची कृपा राहते, शनी देवाच्या वक्र दृष्टी पासून आपले रक्षण होते. परिणामी आपली सतत प्रगती होत राहते.
4) मोरपंख
मित्रांनो 4थी जी वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख. मोरपंख मुळातच पवित्र मानला जातो. भगवान श्री कृष्णा ला मोरपंख अतिशय पवित्र होता. भगवान श्री कृष्णांनी आपल्या मुकुटावर या मोरपंखास स्थान दिलेलं होतं.
मित्रांनो वास्तुशास्त्र सुद्धा असं मानत की ज्या ठिकाणी मोरपंख असतो, त्या ठिकाणी केलेलं प्रत्येक काम हे यशस्वी होते. मोरपंख असलेल्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.
मित्रांनो मोरपंख खरेदी केल्यानंतर तो तुम्ही आपल्या घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर लावा. जेणेकरून धन प्राप्ती, पैशाची प्राप्ती मोठ्या प्रमाणात होईल. तुमच्या घरी कधीही पैशाची टंचाई जाणवणार नाही.
उत्तर दिशेला मोरपंख लावल्याने माता लक्ष्मी आणि कुबेर देव प्रसन्न होतात आणि आपल्याला धन प्राप्ती होते.
पूर्व दिशेच्या भिंतीवर मोरपंख लावल्याने आपल्या घरातील आजारपण दूर होते. जर तुमच्या घरी आजारपण असेल तर पूर्व दिशेला सुद्धा एक मोरपंख लावा.
तुम्ही दोन मोरपंख खरेदी करून उत्तर आणि पूर्व भिंतीवर लावू शकता.
मित्रांनो ईशान्य दिशा जी आहे ती सुद्धा मोरपंख लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तर या दिशांच्या मध्ये येणारी दिशा. या ठिकाणी सुद्धा आपण मोरपंख लावू शकतो.
5) लाफिंग बुद्धा
मित्रांनो शेवटची जी वस्तू आपण खरेदी करायची आहे ती म्हणजे लाफिंग बुद्धा ची मूर्ती.
आपण चायनीज फेंगशुई बद्दल ऐकलं असेल. ज्या प्रमाणे भारतात वास्तूशास्त्र वापरले जाते त्याचप्रमाणे चीन मध्ये फेंगशुई ही पद्धत वापरली जाते.
ज्या ठिकाणी लाफिंग बुद्धा ची मूर्ती असते त्या ठिकाणी सुख, समृद्धी येते. मित्रांनो तुम्हाला जर कोणी लाफिंग बुध्दा ची मूर्ती भेट म्हणून दिली तर ते भाग्य प्रबळ होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच मानलं जातं.
आपल्या मित्रांनी, नातेवाईकांनी जर आपल्याला लाफिंग बुद्धा ची मूर्ती दिली तर आपलं नशीब प्रबळ होण्यास त्याचा खूप फायदा होतो.
पण जर कोणी भेट दिली नाही तरी आपण स्वतः ही मूर्ती खरेदी करू शकतो. आणि ही मूर्ती खरेदी करण्यासाठी नवीन वर्षा सारखा शुभ मुहूर्त दुसरा कोणता असणार.
मित्रांनो लाफिंग बुद्धा मध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते.
घरातील सुख समृद्धी वाढवण्यासाठी, धनामध्ये वाढ करण्यासाठी, घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण लाफिंग बुद्धा ची मूर्ती अवश्य खरेदी करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.