नमस्कार मित्रानो
तुम्ही सर्वांनीच आजवर गरुड पुराणाबद्दल काही ना काही ऐकले असेलच. गरुड पुराणात जीवन आणि मृत्यूशी संबंधित बऱ्याच रहस्यमयी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. भगवान विष्णूंनी याचे वर्णन केले आहे. यामध्ये ज्ञान, विज्ञान , धर्म याबरोबरच पाप, पुण्य, स्वर्ग, नरक यांच्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत.
हिंदू धर्माच्या 18 पुराणांमध्ये हा एक विशेष धार्मिक ग्रंथ मानला जातो. भगवान श्री कृष्णाने श्रीमद् भागवत गीतेत म्हटले होते की आत्मा अमर आहे. ज्याप्रमाणे आपण कपडे बदलतो, त्याचप्रमाणे आत्मा शरीर बदलतो, पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न पडतो की कोणत्या आत्म्याला कोणता जन्म द्यायचा हे कशाचा आधारावर ठरत ?
या सर्व रहस्यमयी प्रश्नांचा उल्लेख गरुण पुराणात सापडतो. हे दोन भागात विभागले गेले आहे, पहिला भाग भगवान विष्णूच्या भक्तीशी संबंधित आहे. दुसरा भाग तुम्हाला हे सांगतो की मृत्यूनंतर माणसाचे काय होते , तो कोणत्या स्वरूपात जन्माला येतो . या पुराणाचे दैवत भगवान विष्णू आहेत, म्हणून त्याला वैष्णव पुराण असेही म्हणतात. चला तर मग असेच काही रहस्य जाणून घेऊया जे पुनर्जन्माशी संबंधित आहेत.
गरुडाच्या विनंतीवरून परमेश्वराने ही रहस्ये सांगितली होती
भगवान विष्णूंचे वाहन गरुडाच्या विनंतीवरून त्यांनी जीवन, मृत्यू, आत्मा यांच्याशी संबंधित अनेक रहस्यांचे वर्णन केले होते. हे देखील सांगण्यात आले की आपला पुढील जन्म कोठे होईल , कोणत्या स्वरूपात होईल हे आपल्या कर्मावर निश्चित केले जाईल. मित्रानो आपणच आपल्या भाग्याचे निर्माते आहोत.
गर्भधारणेच्या वेळी पुरुष आणि स्त्रीच्या मनात असलेल्या विचारांच्या आधारे मुलाचे स्वरूप निश्चित केले जाते. त्यामुळे आपले विचार चांगले आणि मन नेहमी आनंदी ठेवा. मनुष्याचे जीवन धर्म आणि नक्षत्रांच्या प्रभावाने चालते.
त्यांच्या हालचालींच्या बदलामुळे आयुष्यात अनेक बदल होत राहतात. गरुडपुराणानुसार जेव्हा एखादा शुभ ग्रह त्याच्या उच्च स्थानावर असतो, तेव्हा त्यातून एक सद्गुणी आत्मा जन्माला येतो, जो सद्गुणी असतो आणि कुटुंबाचे नाव रोशन करतो.
जर या जन्मात एखाद्या व्यक्तीची कर्मे चांगली असतील, तो लोकांसाठी चांगले कार्य करत असेल, तो लोकांच्या दुःखामुळे स्वतः दुखी होत असेल आणि लोकांच्या आनंदाचे कारण बनत असेल तर गरुड पुराणानुसार, अशा लोकांना चांगल्या आणि समृद्ध घरात पुनर्जन्म मिळतो.
पुढचा जन्म किती आनंदी असेल हे तुमच्या आताच्या कर्मावर अवलंबून असते. म्हणूनच म्हटले आहे, हे मानवा कृती करून परिणामाची चिंता करू नकोस. तुमच्या सत्कर्माचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल, आणि ते कोणत्याही स्वरूपात मिळेल.
गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की मृत्यूच्या वेळी तुमचे मन ज्या गोष्टीत गुंतले आहे किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात त्या गोष्टीचा संबंध तुमच्या पुढील जन्मात येतो. जसे कि एखादा व्यक्ती मरते वेळी एखाद्या स्त्रीला आठवत असेल तर त्याचा पुढचा जन्म स्त्रीच्या रूपात होतो.
म्हणूनच असे म्हटले जाते की शेवटच्या क्षणात रामाचे नाव घ्या, परमेश्वराचे स्मरण करा. जर तुम्हाला ईश्वराची आठवण झाली तर तुम्ही मुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल कराल. पुढील जन्माचे स्वरूप या जन्मातील आपल्या कर्मावर निश्चित केले जाते.
जर या जीवनात तुम्ही एखाद्या प्राण्यासारखे वागता, प्राणी जे खातात ते तुम्ही खात असाल तर पुढच्या जन्मात तुम्हाला प्राण्याचे रूप मिळेल. दुसरीकडे, जर या जन्मात तुमच्या सवयी स्त्रियां सारख्या असतील, तुम्ही एखाद्या स्त्री समान वागत असाल तर पुढील जन्मात तुम्ही स्त्रीचे रूप धारण कराल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.