नमस्कार मित्रांनो
मित्रानो आज काल आपल्या पैकी बऱ्याच जणांना पोट साफ न होण्याची समस्या होत असल्याचे बघायला मिळते. अनेक जण सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होण्यासाठी त्रस्त असतात. पोट साफ होण्यासाठी खूप वेळ लागत असेल किंवा जास्त जोर द्यावा लागत असेल.
औषध घेऊन देखील पोट साफ होत नसेल तर हा उपाय अशा व्यक्तींसाठी संजीवनी ठरणार आहे. उपाय केल्यानंतर तुमच्या आतड्यांची कार्यक्षमता वाढून पचनशक्ती वाढेल.
चांगल्या रीतीने पचन होऊन विनाकष्ट सहज रित्या पोट साफ होईल. शरीरातील लहान आतडे असू दे किंवा मोठे आतडे असुदे सर्व जुनी घाण बाहेर काढण्यासाठी आजचा उपाय हा अत्यंत लाभदायी ठरणार आहे.
या सोबतच तुम्हाला पित्ताचा त्रास असेल गोळी घेऊन ही वारंवार पित्त होत असेल, शरीरात उष्णता होत असेल तर अशा व्यक्तींना देखील या उपायाने अत्यंत लाभ होईल. सोबतच लठ्ठपणाला लगाम लागून तुमचे वजन कमी होईल.
दातांच्या तक्रारींवर देखील आजचा हा उपाय अत्यंत गुणकारी आहे. या उपायासाठी घरगुती पदार्थच लागणार आहेत. कोणते पदार्थ लागणार उपाय कसा करायचा कधी करायचा याबद्दल विस्तृत माहिती आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत.
उपायासाठी पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बाळहिरडा. हा बाळहिरडा कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतो. यामध्ये असणारे एंटीऑक्सीडेंट घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात.
या सोबतच तुमची बिघडलेली पाचन शक्ती सुधारते. वर्षानुवर्षे तुमच्या पोटात साठवलेली जुनी चिवट घाण बाहेर पडते. यासाठी आयुर्वेदामध्ये बाळहिरडा अत्यंत प्रभावी सांगितला आहे. त्यासोबतच केसगळती, दात दुखणे, पोटात दुखणे इतकेच काय तर केस काळे करण्यासाठी देखील बाळहिरडा फायदेशीर ठरतो.
पित्त वाढणे, उष्णता होणे यासाठी जर तुम्ही नियमित गोळ्या घेत असाल तर हा उपाय तुम्ही एक दिवस एक वेळा करा. पित्त आणि उष्णता यांचे शमन होते. या उपायासाठी दुसरा घटक लागणार आहे ते म्हणजे एरंडीचे तेल.
ज्याप्रमाणे केसांच्या व त्वचेच्या तक्रारींसाठी एरंडीचे तेल फायदेशीर ठरते त्याच पद्धतीने पोटातील घाण, मल विसर्जनाचा मंदावलेला वेग वाढवण्यासाठी, लहान मोठे आतडे साफ करण्यासाठी आयुर्वेदामध्ये एरंडीचे तेल अत्यंत गुणकारी मानले जाते.
चार एरंडीचे तेल एका भांड्यात घेऊन गरम करायला ठेवा. यामध्ये सहा ते सात बाळहिरडा घालून तळून घ्या. तळून त्याचा आकार दुप्पट होईल. गरम असतानाच मिक्सर मधून हे बारीक करून घ्यावे. आता हे चूर्ण आपले तयार झाले आहे.
हे मिश्रण रात्री झोपताना एक चमचा खावे आणि त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. किंवा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा हे मिश्रण घालून ते पाणी प्यावे. सकाळी उठल्यावर कोणताही त्रास न होता पोट आपोआप साफ होईल.
हा उपाय सलग पंधरा दिवस करा. एक दिवस गॅप घ्या. परत सलग सात दिवस हा उपाय करा. अस केल्याने पोट साफ न होण्याची समस्या खात्रीने संपेल.
आशा आहे हा सहज सोपा सांगितलेला उपाय तुम्हाला आवडला असेल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हा उपाय तुम्ही गरजू व्यक्ती सोबत नक्की शेयर करा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.