उद्या पहिला श्रावण सोमवार… लावा हे एक झाड… घरासमोर असेल हे झाड तर कोणीही वाकडं करू शकणार नाही…

0
325

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो हे झाड आपल्या घरासमोर लावल्याने घरात प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील लोकांचे आरोग्यही चांगले राहते. ज्या घरामध्ये हे झाड असेल त्या घरातील लोकांची कामे ही अगदी सहज पार पडतात. कामात प्रगती येते कोणत्याही अडचणी येत नाहीत.

मित्रांनो हे झाड म्हणजे बेलाचे झाड. शिवशंभूच्या पूजेमध्ये बेल पत्रा चे मोठे महत्व आहे हे आपल्याला माहीत आहे. शिवशंभूंची असीम कृपा प्राप्त करण्यासाठी हे बेलपत्र कामी येतात. अडचणी कितीही मोठ्या असतील तरी त्यांच्यापासून बचाव करण्याचं काम हे बेलपत्र करत असते.

मित्रांनो तुम्ही रोज शिव पूजा करताना या बेलपत्रा चा वापर करू शकता. जोपर्यंत ही बेलपत्र सुकत नाही तोपर्यंत त्यांचा वापर करता येतो. सोमवार अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी बेलपत्र तोडू नका. शास्त्राला ते मान्य नाही.

रविवारी येणारी द्वादशी अशा दिवशी बेल पत्रांवर दिवा प्रज्वलित केल्यास त्यादिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. जर पैशांची अडचण असेल तर तिथेच दूर होते. यशप्राप्तीसाठी तुम्ही तुमच्या अंगणात हे बेलाचे झाड नक्की लावा.

बेलाचे झाड जिथे असते तिथे शिवकृपा होते. ती जागा म्हणजे काशी समान पुण्य आहे असं धर्मशास्त्र मानते. कोणत्याही प्रकारची काळी जादू तंत्र बाधा पासून बचाव करण्याचे काम हे बेलाचे झाड करते. आपल्या घराला किंवा घरातील सदस्यांना वाईट नजर लागू नये यासाठी सुद्धा हे झाड प्रभावी रीत्या काम करते.

मित्रांनो घरातील सदस्यांमध्ये प्रेमभावना वाढवते आपुलकी निर्माण करते. वर्षभरातील कोणत्याही दिवशी तुम्ही तुमच्या अंगणात बेलाचे झाड लावू शकता.

वास्तुशास्त्रानुसार घराचे उत्तर पश्चिम दिशा म्हणजे वायव्य दिशा हे बेलाचे झाड लावण्यास अत्यंत उपयोगी आहे असे समजले जाते. शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या अंगणात अगदी मध्यभागी सुद्धा या झाडाचे रोपण करू शकता. मित्रांनो तर अशा या बेलाचे झाड तुम्ही तुमच्या अंगणी नक्की लावा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here