नमस्कार मित्रांनो,
आपल्या पुराणामध्ये देवी, देवता, मनुष्य, प्राणी, पशुपक्षी तसेच वनस्पती या सर्वांना बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कोणत्या दिवशी काय करावे, घरात काय ठेवावे, किंवा काय ठेवू नये. कोणत्या वस्तू आपल्या घरासाठी शुभ आहेत तर कोणत्या वस्तू अशुभ आहेत. हे सर्व आपल्याला आपल्या हिंदू धर्मात सापडते.
मित्रांनो वास्तुशास्त्रात अशी काही झाडे सांगितलेली आहेत, जी आपण आपल्या घरात लावल्यास माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरात होते. आणि आपण लवकरच करोडपती सुद्धा होऊ शकतो.
आज आपण अशीच 5 झाडे पाहणार आहोत. या पाच झाडांपैकी एकही झाड आपण आपल्या अंगणात लावले, तर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होऊन धनाचा वर्षाव होईल.
चला तर जाणून घेऊयात ती कोणकोणती झाडे आहेत ते.
मित्रांनो जसजसा काळ बदलत गेला तसे लोक गावं सोडून शहरात स्थलांतरित होऊ लागली. नोकरी साठी किंवा मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गावाकडून शहराकडे येण्याचे प्रमाण वाढू लागले.
सुरुवातीला शहरातील लोकसंख्या जास्त नसल्यामुळे बैठी घरे त्यामध्ये अंगण व छोटीशी बाग करणे शक्य होते. कारण जागेची कमतरताच नव्हती.
पण जसजशी लोकसंख्या वाढू लागली तसतशी राहण्यासाठी जागा कमी पडू लागली. बैठी घरे आता उंच उंच इमारतीत बदलू लागली.
घरांचे आकार लहान होऊ लागले जागा पुरेनाशी होऊ लागले. तिथे अंगण तुटले त्यामुळे घरातील बाग देखील नाहीशी झाली.
वास्तुशास्त्रानुसार घरामधे काही प्रकारची झाडे असणे शुभ समजले गेले आहे. आज आपल्या घरामधे अंगण नसले तरी आपण ही झाडे आपल्या घरात वाढवू शकता. घरामधे तुळशीचे रोप असणे हे शतकानु शतके परंपरा चालत आलेली आहे.
हिंदू धर्मामध्ये तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. तुळशीमध्ये अनेक औ षधी गुण असून यामुळे घरामधे विपत्ती येत नाही.
तुळशीचे रोप घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. बांबुचे रोप घरात सुखसमृद्धी आणते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शांतता ही घरात आणते.
बांबुचे रोप कोणत्याही हवेमध्ये वाढते त्यामुळे हे दीर्घायुष्य, उन्नती, सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते. हे रोप घरातील कुठल्याही दिशेला लावले जाऊ शकते.
केळीचे रोप हे सुद्धा घरात सुखसमृद्धी आणते. या रोपामध्ये श्रीहरी विष्णूचा वास असून या रोपामुळे घरात आर्थिक सुख नांदते. घराच्या इशान्य दिशेला केळीचे रोप लावावे.
तुळशीप्रमाणेच घरामधे हळदीचे रोप असणे शुभ मानले गेले आहे. पुजा रीती मध्ये, औष धी म्हणून आणि सौंदयामध्ये हळदीचा वापर अनेक शतकापासुन केला जात आहे.
तसेच आवळ्याचे झाड हे पाप नष्ट करणारे आहे असे म्हटले जाते. हे झाड घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे.
घरात जास्वंद असणे शुभ मानले गेले आहे घरातील कोणत्याही दिशेला जास्वंद लावू शकतो. हिरव्यागार झाडांमुळे ऑ क्सि जन मिळतो, वातावरण देखील शुद्ध होते, घरामधे झाडे आणि रोपटे यांमुळे सकारात्मकता वाढते.
वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे आहेत ज्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी येते.
अश्याच काही झाडांमुळे घरातील वातावरण चांगले राहते. व हिंदू धर्मात या झाडांना महत्वाचे मानले जाते. हिंदू धर्मात मंदार नावाचे रोपटे शुभ मानले जाते.
मंदारच्या झाडामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते. जोडप्यांमध्ये प्रेम वाढले जाते. आणि घराला दृष्ट लागत नाही.
अशाच प्रकारे अशोकाचे झाड शुभ मानले जाते घरातील दोष दूर होतो. हे झाड घराच्या उत्तरेला लावले जाते.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.