नमस्कार मित्रांनो,
पितृदोष कसा ओळखावा? पितृदोष आहे कि नाही? हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक आहे. परंतु आपल्या धावत्या जीवनात अचूक जन्मतिथी, जन्मवेळ लक्षात न राहिल्याने आपली कुंडली तयार होऊ शकत नाही.
अनेक लोकांकडे हे सर्व माहिती असते तरी कुंडली अभावी पितृदोष आहे कि नाही याचे निदान होणे कठीण होते. मात्र यावर जोतिषशास्त्रात तोडगा सांगितला गेलेला आहे.
आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी एक दृष्टी आपल्याकडे असली तर आपल्याला माहिती होते कि पितृ दोष आहे कि नाही. हे आपणच स्वतः ओळखू शकतो.
आज आम्ही तुम्हाला काही अशाच गोष्टी सांगणार आहोत यापैकी कुठलीही एक गोष्ट तुमच्या सोबत घडत असेल तर समजून जा कि तुम्हाला सुद्धा पितृ दोष आहे.
मित्रांनो कुटुंबात वडील व मुलगा यांच्यात नेहमी खटके उडणे, दोघांमध्ये प्रचंड मत भेद असतील किंवा विचार बिलकुल जुळत नसतील, सतत भांडण होत असतील तर समजावे कि पितृदोष आहे.
मुलगा किंवा मुलगी यांचा विवाह जुळून येण्यास नेहमी बाधा उत्पन्न होत असेल , किंवा जुळलेलं लग्न मोडत असेल, कुंडली जुळत असेल परंतु काही कारणास्तव विवाह जुळत नसेल तर पितृदोष असू शकतो.
विवाह होऊन अनेक वर्ष झाले परंतु घरात पाळणा अजून हलला नाहीये, वारंवार गर्भपात होत आहेत किंवा अपंग मुले जन्माला येत आहेत याचा अर्थ सुद्धा पितृदोष असू शकतो.
आपल्या कुटुंबातील एकामागोमाग एक सदस्य आजारी पडत असतील हे सुद्धा पितृ दोषाचे लक्षण असू शकते. कर्जाचे डोंगर डोक्यावर वाढणे , व्यापार व व्यवसायात नुकसान होणे, परिश्रम घेऊन सुद्धा नोकरीमध्ये यश मिळत नाहीये. यामागे सुद्धा पितृदोष असू शकतो.
कुटुंबातील सदस्यांचे आपापसात सतत भांडण होणे, अन्न धान्याची बरकत नसणे, घरात वारंवार वायफळ खर्च होणे याचा अर्थ सुद्धा पितृ दोष असू शकतो.
तर मित्रांनो हि काही कारणे आहेत जी पितृ दोष असण्याचा आपल्याला संकेत देतात. तर तुम्ही या सर्व कारणांवरून माहिती करून घेऊ शकता कि तुम्हाला पितृदोष आहे कि नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.